-
बंधमुक्त – BANDH MUKT
प्रतिभेने मज माध्यम दिधले काव्य व्यक्त व्हावया अंतर म्हणते लिही लिही मन बंधमुक्त व्हावया प्रिय मज माध्यम काव्यच आहे अन्य माध्यमाहुनी भजते जपते शब्दाक्षर मी काव्यभक्त व्हावया काळोखाला उसवुन रगडुन घडीव पाट्यावरी गाळत बसते भाव गडद मी स्वच्छ रक्त व्हावया पहाट सुरभित शीतल शुभ्रा प्रसाद देण्या शुद्ध ओंजळीत मम दव सांडविते एकभुक्त व्हावया झरते पडते…
-
सोय – SOY
मौन जपे मी काव्यामध्ये जरी भासले तेव्हा कोणा मरगळल्यासारखी मॅड मला घनचक्कर म्हणता शब्दकळा गोठवीत गेले साकळल्यासारखी शब्दकळेला वा भावांना स्वतःच सुंदर कुरुप बनविता पाहुन अपुली सोय साधे सोपे नियम पाळण्या घडीत नाही नाही म्हणता घडीत म्हणता होय
-
अक्षर मोती – AKSHAR MOTEE
नकोच काही देणेघेणे लिहावी छान मी गझल फुलपाखरासम उडायाला विणावी छान मी गझल उडून उडून दमल्यावरती चित्रात रेखण्या तिला चिमटीत सान पकडुन पंख धरावी छान मी गझल अंगणातल्या दोरीवरती वाऱ्यात सुकवायाला बुडवून वाहत्या निर्झरात पिळावी छान मी गझल भूचक्रासम गरगर फिरण्या तेलात सोडून उष्ण तांबूस लाल खुलाया रंग तळावी छान मी गझल झुळझुळ पहाट वाऱ्यासंगे…
-
सीमोल्लंघन SEEMOLLANGHAN
सीमेचे उल्लंघन केल्यानंतर बोलू पुन्हा वेगळे आल्यावर प्रत्यंतर बोलू भटकुन भटकुन मन थकल्यावर ध्यानाग्नीतुन हरेक ओठांवर हलतो तो मंतर बोलू आंतरजाली फिरती शोधक नित्य इंजिने गूगलवरच्या इंजिनांस त्या व्यंतर बोलू देव पाहण्या नकाच काटू अंतर बिंतर नीतळ आत्म्यालाच स्वतःच्या अंतर बोलू विचार मंथन करण्याचा अन बोलायाचा मला सुनेत्रा आहे ध्यास निरंतर बोलू
-
गुल्लिका – GULLIKAA
विंध्यगिरीवर श्यामल सुंदर जलद दाटले पुन्हा गोमटेश बाहुबलीवर जल मुक्त सांडले पुन्हा हाती चंबू सान दुधाचा टोकावर गुल्लिका धार ओतता धवल दुग्धमय घन कोसळले पुन्हा नीर क्षीर चंदन अन केशर अष्टगंध औषधी प्रपात धो धो सुवर्ण हळदी लोट उसळले पुन्हा पारिजात मोगरा चमेली चंपक जाई जुई सुरभित पुष्पांनी भरलेले मेघ बरसले पुन्हा अखंड रज्जूवर प्रेमाच्या…
-
अभ्यंतर – ABHYANTAR
टिपत राहणे काव्य निरंतर हाच जादुई जंतर मंतर माझ्यासाठी मम अभिव्यक्ती हाच जादुई जंतर मंतर अभ्यंतर काबूत असावे हाच जादुई जंतर मंतर अंतर अपुले सतत चाळणे हाच जादुई जंतर मंतर अंतर पाहुन वेग ठरविणे हाच जादुई जंतर मंतर स्त्री पुरुष दो माणूस जाती हाच जादुई जंतर मंतर देव नारकी गती जाणणे हाच जादुई जंतर मंतर…