झाडे लावू – ZAADE LAAVU


दोन मुक्तके

उखळ …
उखळात धान कांडा म्हणतेय मुसळ बाई
डोळ्यातले स्वतःच्या काढून कुसळ बाई
मटकी मसूर चवळी भिजवून ठेव रात्री
उकळून घ्या सकाळी करण्यास उसळ बाई

झाडे लावू …
उखाळ्या पाखाळ्या करण्यात वेळ वाया जाई
कुटाळक्या चहाड्या करण्यात वेळ वाया जाई
चला झाडे लावू पाऊस मेघ वर्षायाला
मस्तीत टवाळ्या करण्यात वेळ वाया जाई

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.