Tag: Ghazal in maatraa vrutta

  • रे अन सा – RE AN SAA

    वारा म्हणे ढगाला जा तू धरेवरी भिजवून तप्त माती गा तू धरेवरी मरुतास सलिल सांगे येइन तुजसवेच बिजलीसवे पडोनी पातू धरेवरी उतणार जलद काळे सांडणार धो धो खेळून मृत्तीकेत मातू धरेवरी आता नकोस नाचू वेगात ये घना लावावयास रे अन सा तू धरेवरी होताच सांज येती गाई घराकडे रंगात गोधूलीच्या न्हा तू धरेवरी गझल मात्रावृत्त…

  • कोळी – KOLEE

    काल पेटली दारी होळी आज मस्त पुरणाची पोळी दो प्रहरी तू येच पावसा पाडाया गारांची टोळी धारांसंगे करूत गप्पा भर-भरण्या गारांनी झोळी येता वादळ अपुल्यामध्ये त्यांस पकडण्या येइल कोळी सहाण घेऊ चंदन उगळू गुळात घोळुन बनवू गोळी येता कपटी भेटायाला मिळून चौघे बांधू मोळी गझल – मात्रावृत्त, मात्रा १६(८+८)

  • स्वर्ण – SWARN

    असे असावे धैर्य हृदयीचे पाण्याला जे बर्फ बनविते असे असावे शौर्य नारीचे अर्धे जे जे पूर्ण बनविते असे असावे विणूनी शिवणे पुण्याने जे अर्थ बनविते असे असावे ऊन हळदीचे कर्माला जे जीर्ण बनविते असे असावे पैंजण पदीचे रुणझुणते जे तर्क बनविते असे असावे झिजणे चंदनी हितकर प्रिय जे अर्क बनविते असे असावे वादळ आत्मीक स्वभावास…

  • चक्रीवादळ – CHAKREE VAADAL

    आहे ओंजळ खरी अंजली नाही मृगजळ खरी अंजली उठवुन मोहळ खरी अंजली बनते वादळ खरी अंजली पाणिपात्र मम भरण्यासाठी फोडे कातळ खरी अंजली कधी झुळूक तर कधी भासते चक्रीवादळ खरी अंजली आज सुनेत्रा तृप्त जाहली बनता वाकळ खरी अंजली गझल – मात्रावृत्त (मात्रा १६)

  • सोहम – SOHAM

    प्रथम दीन तव कुवेड गे गरम मीन तव कुवेड गे टोचत आहे तुझे तुला कलम पीन तव कुवेड गे जा जा जा तू कर काळे तलम जीन तव कुवेड गे नकोच दारी पाय तुझा परम हीन तव कुवेड गे कुदेव-देवी मूढ मती शरम लीन तव कुवेड गे सम्यक्त्वाने संपविले अधम बीन तव कुवेड गे सोहम…

  • यात्रा – YAATRAA

    वेध तुझ्या यात्रेचे मज अता लागले रे दर्शनास आतुर डोळे साद ऐकते रे एक एक पाउल उमटत,असे वाज वाजे संगतीस प्रियजन त्यांची गाज जाहले रे निळ्या डोंगराच्या रांगा नभा वेढणाऱ्या गाठण्यास टोके सुंदर गात चालले रे पल्लवीत हिरव्या राया मोहरून आल्या आम्र मंजिरी मी मजला झुळुक चुंबते रे सुनेत्रात भरुनी घेउन स्वरुप आत्मदेवा तुझे भाव…

  • वडापाव – VADAA PAAV

    घरकामाला सुट्टी घे पण नको आज तू भांडुस सखये वडापावची गाडी आली नको पसारा मांडुस सखये वडापाव हा जरी कालचा पाव भाजला तुपात खरपुस खलात त्याला टाकुन वेगे नकोच रागे कांडुस सखये तू तर माझी प्रियतम साकी खिलव वडे या रसिक जनांना गझलांनी मी भरले प्याले नको ग त्यांना सांडुस सखये नको टमाटे वडे फेकणे…