Tag: Ghazal in maatraa vrutta

  • कविता माझी – KAVITAA MAAZEE

    कविता माझी बोलत असते माझ्यासंगे कविता माझी भांडत असते माझ्यासंगे भूक लागता कडकडुनी मज लपवुनी कागद कविता माझी जेवत असते माझ्यासंगे चिंब भिजविता भाव भावना सुकण्यासाठी कविता माझी वाळत असते माझ्यासंगे कविता म्हणजे व्यक्ती नाही अंतर माझे कविता माझी पाहत असते माझ्यासंगे अंतरातली साद ऐकण्या साद घालुनी कविता माझी ऐकत असते माझ्यासंगे अमूल्य माझे हृदय…

  • गोखरू – GOKHAROO

    गगन भरारी घेण्यासाठी सज्ज पाखरू पुन्हा जाहले धावायाला कुरणावरती सज्ज कोकरू पुन्हा जाहले गाय चाटता वात्सल्याने वाघाच्या बछड्यास सानुल्या क्षीर प्यायला वाघीणीचे सज्ज वासरू पुन्हा जाहले मौन जरी मी तुम्हास वाटे मंजुळ छुमछुम वाजायाला पैंजणातले अस्सल नाजुक सज्ज घुंगरू पुन्हा जाहले कर्मनिर्जरा होण्यासाठी अंगागाला बोचायाला बाभुळकाटे कुसळ सराटे सज्ज गोखरू पुन्हा जाहले मेंढपाळ मी गौर…

  • मनमौजी – MAN-MAUJEE

    पुत्र असा मम दिव्य मणी कन्या सुंदर गुण रमणी झिम्मा फुगडी अन पिंगा खेळायाला चल सजणी उजाड माळावर बागा माझी सुंदर ही करणी गझल गझालां मनमौजी हरिणी म्हण वा तिज हरणी सुनेत्रात हे सुनेत्र दो जणू क्षमेची लाल फणी गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)

  • तेलदिवे – TEL-DIVE

    जपण्यासाठी तेलदिवे मंदिर मातीचेच हवे जरी भाकऱ्या चौकोनी भाजायाला गोल तवे जडव कोंदणी मोती दो शुभ भावांचे उडव थवे अभयारण्यी वावरती गेंडे हत्ती रानगवे जुने जपोनी जाय पुढे सुनेत्रातले काव्य नवे गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)

  • अलख निरंजन – ALAKH NIRANJAN

    मौक्तिकांस मी ओळखते खऱ्या हिऱ्याला पारखते कर्म निर्जरा करावया लावुन काडी जाळ खते पाण्यासंगे झाडाला करून आळे घाल खते खतांचाच तू व्यापारी भर पोते अन वीक खते चाळणीतल्या जलामधे मिसळुन सारी गाळ खते तर्हेतऱ्हेच्या कुदळीन्नी खणून खड्डा गाड खते अलख निरंजन म्हणताना स्वामी हसती गोरख ते गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)

  • जिनमुद्रा – JINAMUDRAA

    उडवू पुष्पक सतीसकट तिचा व्हावया पती प्रकट वनी सारिका गाताना होईल ग तो यती प्रकट सुरुंग लावुन बघत रहा खळाळण्या गोमती प्रकट स्वर्ग धरेवर अवतरता मदनासंगे रती प्रकट बर्फ कुटीतील गाभारी जिनमुद्रा पार्वती प्रकट गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)

  • धर्मगती – DHARM-GATEE

    खडका दे लाटेस मती येण्या जाळ्यात ती रती हिरवा पाचोळा उडता चंचल हरिणी बावरती काढ असे तू चित्र अता सरिता तो अन सागर ती संकटात ना डगमगते कणखर पण भावूक सती असो दैत्य वा देवरुपी मुक्त करे मज धर्मगती गझल मात्रावृत्त (मात्रा १४)