-
यमाई – YAMAAEE
नजरेमध्ये प्रेम असूदे विषय कशाला वयात अन्तर अंतरात मग प्रणय कशाला भाव भावना भरून वाहे कुठे वास ना वसन लपेटू दहा दिशांचे प्रलय कशाला स्वभाव अपुला जपेल ‘मी’ रे नको काळजी कधी उसळ अन उर्मट हो तू विनय कशाला मला न भीती अपघाताची अन मरणाची मीच यमाई तुझ्याकडुन मज अभय कशाला अचूक समयी समई विझते…
-
भुगा – BHUGAA
अखेर मी गाठलेच त्यांना अखेर मी कोंडलेच त्यांना वरून अक्षत जरी वाटती अखेर मी चाळलेच त्यांना किती खडे पांढरे काढुनी अखेर मी ठेचलेच त्यांना ठेचुन चेचुन भुगा करोनी अखेर मी पेरलेच त्यांना सुगंध मातीतला उधळण्या अखेर मी वाटलेच त्यांना मात्रावृत्त(१६मात्रा)
-
बादल – BAADAL
बादलीत बरसतोय बादल दलदलीत झिरपतोय बादल बदबद वर्षत रिता जाहला रिक्त मनी पसरतोय बादल दल बदलूनी गिरगिट होतो शेर होत गरजतोय बादल श्वेतश्याम वा कृष्णधवल म्हण शब्द अब्द प्रसवतोय बादल हलका फुलका पुन्हा होउनी निळ्या नभी लहरतोय बादल मात्रावृत्त(१६मात्रा)
-
मुस्कट दाबिन – MUSKAT DAABIN
पाताळातुन तुजला शोधिन नाव सुनेत्रा लावे मी प्रकाशवेगा मागे टाकिन नाव सुनेत्रा लावे मी जरी नाटके करून सोंगे येशिल माझ्या पुढ्यात तू तुझे मुखवटे उखडुन फेकिन नाव सुनेत्रा लावे मी कलशावरती करुन मुलामा म्हणे जरी तो चंद्र पहा प्रकाशासही काळे फासिन नाव सुनेत्रा लावे मी मणामणाचे जरी घुंगरू दिलेस मज तू बांधाया तुडवुन तुजला गाईन…
-
नजरकैद – NAJAR KAID
शब्दांना भोगले तरीही शब्दांना जागले विषयांनी ग्रासले तरीही विषयांना जागले वस्त्र बदलले देश बदलले भोगांसाठी नव्या भोगांनी गाडली सुखे पण भोगांना जागले स्तुति सुमनांना भुलून जाता तनू पुलकित झाली गंधांनी भाजून निघाले गंधांना जागले अनुरागातच रमले झुरले नजरकैद जाहली रागांनी कोंडले मला पण रागांना जागले रुपांतर रंगांतर केले मूळ स्वभाव तसाच अनेक धर्मी स्वभाव जपण्या…
-
सोंगाडे – SONGAADE
अनंत रूपे घेउन छळण्या कैक भेटले सोंगाडे सिद्धपथाला तुक्या लागला जरी कुणी ना वाटाडे किती भामटे भोंदू साधू भोळे शंकर भासविती डोईवरच्या जटा वाढवुन घालुन फिरती अंबाडे आकाशातिल ग्रह ताऱ्यांना कुंडलीत का बसवीती दिशाभूल करण्या भोळ्यांची लुटण्या त्यांना थापाडे मृत व्यक्तीचे शरीर जाळुन अथवा मातीत गाडून नाश पावते तनु अन उरती फक्त सापळे सांगाडे खरी…
-
हंगामा – HANGAAMAA
वृद्ध घालता धिंगाणा किती माजला हंगामा नाठी बुद्धी साठीला प्रत्यंतर बघ हा दंगा आजोबांच्या काठ्यांनी चोपचोपले अंगांगा आगडोंब वळ उठलेहे बोलव आगीच्या बंबा बंबाची वाजे घंटा पोरांनो थांबा थांबा गझल मात्रावृत्त (मात्रा १४)