-
उदक – UDAK (water)
किती जाहल्या चुका कुणाच्या मोजत बसले नाही हिशेब असला ठेवुन हृदयी भांडे भरले नाही कितीक पात्रे घासघासली आतुन बाहेरूनी साठवुनी जल गढुळ खरकटे तयांस धुतले नाही आले नाही नळास पाणी शुद्धीलाही जेव्हा विहिरीवरुनी केल्या खेपा लोळत पडले नाही वळिवाच्या गारांना मी भरून हौदामध्ये कोरफडीची बाग फुलविली ओटे पुसले नाही वाळा घालुन माठामध्ये उदक सुवासिक केले…
-
मोदक – MODAK (sweet dish)
मोदकांस दे आसन सुंदर कारण त्यातिल सारण सुंदर वर्तमान हा अतीव सुंदर भूतच होता कारण सुंदर ग्रंथ समीक्षा ललित कथांची उघडू त्यांचे बासन सुंदर माझे पुस्तक प्रसिद्ध जगती अक्षर अक्षर पावन सुंदर घर सजण्या मम रम्य भूतली वृक्षांचे संभारण सुंदर जागृत चेतन मन वैमानिक नेणिव दैवी साधन सुंदर गझल – मात्रावृत्त (मात्रा १६)
-
ध्वजा – DHVAJAA (flag)
ज्योतीने मी ज्योत लावली ज्योत तेवण्या जीवांची ज्योतीने या धरा उजळली प्रीत पेरण्या जीवांची डोळस अंधांना नयदृष्टी देण्यासाठी ज्योत मिटे काळोखाला टिकवुन ठेवे ठेव ठेवण्या जीवांची करी कुंचला शशिकिरणांचा हाती सृष्टीच्याच असे कैवल्याच्या भिजुन चांदणी कला रेखण्या जीवांची मुनीमनासम नीर वाहते नावेमध्ये शीड उभे रत्नत्रय प्राप्तीच्या मार्गी ध्वजा पेलण्या जीवांची ऐक सुनेत्रा दो नयनांचे दो…
-
दर्रारा – (fear and respect)
आधी वावटळ येते धूळ फर्रारा उडाया दिशा दाही नाचतात पीळ भर्रारा सुटाया पीळ सांग सोडवाया चक्रीवादळी पिसाटा ओत पोते भरुन मीठ भूत गर्रारा फिराया धाव धाव धावताती कृष्ण मेघ सैरावैरा कडाडते वीज बाई खरा दर्रारा कळाया अंगांगात भुईच्या ग काटे कुसळांची गर्दी मातीवर लोळ लोळे वात खर्रारा कराया शुभ्र टपोर गारांचा मारा ढगातून होई गात…
-
अर्घ्यावली – (offering)
मातीलाही स्मरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो वाऱ्यामध्ये तरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो उदकचंदनी रेशिमधारा झेलत असता अंगागावर घटात भूमी भरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो खडीसाखरेसम गारांची जलदांमधुनी वृष्टी होता मातीसुद्धा वरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो तापतापुनी धूप जाळुनी फळाफुलांनी बहरुन येण्या धरा सावळी धरते गाणे वळीव जेव्हा…
-
उच्चारण – (phonetic)
गरजेपुरते बोलाया उच्चारण उरले नव्हते उधारीतले श्वास घ्यावया तारण उरले नव्हते रंगपंचमी खेळायाला साजण उरले नव्हते इंद्रधनू रेखाया क्षितिजी श्रावण उरले नव्हते भूकंपाचा फेरा आला भूमीताई खचली गाई गुरांना बांधायाला दावण उरले नव्हते बाप न उरला माय न उरली घर ते भणभणलेले थांबायाचे कोणासाठी कारण उरले नव्हते सुस्त अजगरे पडून होती पण सळसळण्या तेजे इच्छाधारी…