-
मनमौजी – (rapturous)
-
तेलदिवे – (oil lamps)
-
अलख निरंजन – (“invisible god”)
मौक्तिकांस मी ओळखते खऱ्या हिऱ्याला पारखते कर्म निर्जरा करावया लावुन काडी जाळ खते पाण्यासंगे झाडाला करून आळे घाल खते खतांचाच तू व्यापारी भर पोते अन वीक खते चाळणीतल्या जलामधे मिसळुन सारी गाळ खते तर्हेतऱ्हेच्या कुदळीन्नी खणून खड्डा गाड खते अलख निरंजन म्हणताना स्वामी हसती गोरख ते गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)
-
जिनमुद्रा – (“The Posture of the Victor”)
-
धर्मगती – (“spiritual progress”)
-
ओघळ – OGHAL (a trickle)
अंडाकृति तव प्रिये चेहरा खरबुज वर्णी नीतळ सुंदर कृष्ण कुंतली तुझ्या विपुल घन नेत्रबाण दो सावळ सुंदर पहाट होता वेलींवरल्या पुष्प-पऱ्यांच्या नयनांमधुनी झरती रिमझिम धवल सुवासिक दवबिंदुंचे ओघळ सुंदर पौष पौर्णिमा नेसुन येता निळी पैठणी हरित धरेवर शिशिरामधल्या चांदणराती चिंब भिजावा कातळ सुंदर जुन्या जांभळ्या लुगड्यावरती जोडुन तुकडे चिटा-खणांचे पणजी माझी शिवायची नवी रंगबिरंगी वाकळ…
-
करतळ – KARATAL (palm)