-
मुखवटे – MUKHAVATE
In this Ghazal the poetess says , Around me here and there I see men and women, wearing masks. But I have faith in my eyes. My eyes recognize those eyes which have good vision. कैक मुखवटे वावरती पण मी डोळ्यांना ओळखते तरंगणारी फुले त्यातली अन काट्यांना ओळखते रंग वेगळे पोत वेगळे आकाराने भिन्न जरी…
-
एक लेखणी करी बरी – EK LEKHANI KARI BARI
In this Ghazal the poetess says, “I don’t want ornaments like mangal-sutra(necklace), bangles of gold(bilavar, patali, tode), eardrops and ear-rings, kunku-bindi etc. I want only my fountain-pen(taak, boru,chalk, pen, pencil). I want to write my thoughts, my feelings. This expression of thoughts and feelings will increase my happiness. On the social networking sites, we meet…
-
शुभ्र चांदणे निळसर अंबर – SHUBHRA CHANDANE NILASAR AMBAR
शुभ्र चांदणे निळसर अंबर माझे दादा वसुंधरेवर हसरे झुंबर माझे दादा जरी भासती भोळा शंकर माझे दादा करतिल आता जंतर मंतर माझे दादा माणसातुनी देव घडविती संत-महात्मे फुलांस जपती फोडुन कंकर माझे दादा प्रेमासाठी देशासाठी हटून मागे जिंकतील सत्याचा संगर माझे दादा किती गोरटे किती देखणे रुबाब करतिल खरे हेच पण जगात सुंदर माझे दादा…
-
कोजागिरी मी दवात न्हाते – KOJAGIRI MEE DAVAT NHATE
In winter season Indians celebrate Shradiy pournima. It is also known as ‘Kojagiri pournima’. Pournima means full-moon-day. On this night, friends and family members come together. They drink basundi(masala milk) after seeing an image of full moon in that milk. This night is very pleasant night. In this poem the poetess says that, ‘When my…
-
भावना – BHAVANA
मुग्ध निरागस मधुर भावना, कळली नाही कळीस कारे? निघून गेला शीळ घालुनी, अवखळ चंचल तो वारारे! भावगीत ते कळले नाही, म्हणून झुरते झुळूक आता; गंध प्राशुनी आज तयातिल, बनली आहे ती कवितारे! नकोच होऊ तू परमेश्वर, देवघरातिल पुतळा बनण्या; माझ्यासम तू मानव हो रे, माझ्यासंगे फुलावयारे! पुरे परीक्षा या मातीची, पाणीसुद्धा रंग बदलते; तुझी कसोटी तुला…
-
झालर काळी – ZALAR KALI
पापणीस तव झालर काळी थरथरणारी अतीव सुंदर नकोस मिटवू उघड पाकळ्या कमलदलांसम सजीव सुंदर कधी वाटते खूप रडावे कारण त्याचे नकळे मजला अश्रु-विमोचन करता फुलते अंतरातली उणीव सुंदर मन घाबरते वादळ येता मेघ सावळे मनी दाटता कोसळतो मग तांडव करुनी हवाहवासा वळीव सुंदर शीळ घालतो अवखळ वारा श्यामल शीतल मेघ नाचरे बरसुन विणती अवनीवरती मोर…
-
घर कौलारू – GHAR KOULARU
ओठांमध्ये पालवलेले बोलायाचे आहे मजला चित्रामध्ये आठवलेले रेखायाचे आहे मजला चितारते मी सागर नयनी मिटते डोळे गाज ऐकुनी डोळ्यामध्ये रंगवलेले वाचायाचे आहे मजला रंग-गंध वेचून फुलांचे मधुसंचय मी करित राहिले श्वासामध्ये साठवलेले प्राशायाचे आहे मजला शेकोटीची उब जांभळी शब्द कापरे तप्त जाहले काव्यामध्ये तापवलेले ओतायचे आहे मजला तव झुळकीने मोहरलेल्या कळ्याफुलांचे मुग्ध रंग हे हृदयामध्ये…