In this ghazal it is imagined that sky is playing with colours. The sky becomes colourful.
The poetess is searching her beloved person in the colours of sky, in the singing wind, in the wet petals of flowers like prajakt, jaee etc. she is searching her beloved person in the depth of her heart.
आकाश रंग खेळे, रंगात का सख्या तू
तो रंग श्वास माझा श्वासात का सख्या तू
फुलली पहाट वेडी, वारा घुमे दिवाणा
त्या शीळ घालणाऱ्या, वाऱ्यात का सख्या तू
प्राजक्त गंधवेडा, भिजली दवात जाई
ओल्या तिच्या मनीच्या, पाण्यात का सख्या तू
तो गंध आतलारे, बकुळीस वेड लावी
त्या खोल आतल्यारे, डोहात का सख्या तू
धुमसून सांज जेव्हा, छळते तुला ‘सुनेत्रा’
पाठीवरून फिरतो, तो हात का सख्या तू
वृत्त- गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.