Tag: Marathi Kavita

  • अरण्यरुदन – ARANYA RUDAN

    नको पावसात अरण्यरुदन आवेगाने कोसळ तू आषाढी डोळ्यांसम बरसत अवघ्या देही ओघळ तू लाटांवरती चक्रीवादळ उसळे हृदयातील उचंबळ भरली घागर डोईवरची हिंदकळे अन भिजते चुंबळ अवघड वळणाच्या घाटावर आभाळातुन वीज कडाडे कोमल काळिज हलता क्षणभर भात्यासम मृदु ऊर धडाडे डोंगरमाथ्यावरती छाया काळोखा आलिंगन देते वेळू बनचे अवखळ वारे पापण्यांस चुम्बाया येते गडगडणाऱ्या मेघालाही वेड असावे…

  • पाऊस धारा – PAAOOS DHAARAA

    पाऊस धारा वाऱ्यात नाचत येती दारात फुलवाल्या सुंदर बाला फुले ओविती हारात फिरवित छत्री निळी निळी सखी निघाली तोऱ्यात हूड वासरू भुकेजले तोंड घालते भाऱ्यात कशास तुलना हवी बरे सुई आणखी दोऱ्यात मुक्त मनाला हुंदडुदे नकोस ठेऊ काऱ्यात मुग्ध काव्य मम हृदयातिल उठून दिसते साऱ्यात

  • तुझे माझे – TUZE MAAZE

    तुझ्या माझ्या गोष्टीमध्ये एक कौलारू घर होते प्राजक्ताच्या झाडाखाली मोती-पोवळ्यांचे सर होते तुझ्या माझ्या गोष्टीमध्ये व्हिलन बिलन कधीच नव्हता धो धो कोसळणारा फक्त वेडा पाऊस होता तुझ्या माझ्या गाण्यामध्ये दुःख उसासे कधीच नव्हते दवात भिजल्या भाव फुलांचे एक सुंदर गाव होते तुझ्या माझ्या प्रीतीमध्ये अन्तर शून्य शून्य होते अंतरीच्या पाण्यामध्ये तुझे प्रतिबिंब होते तुझ्या माझ्या…

  • एक साधी सरळ कविता – EK SAADHEE SARALH KAVITAA

    एक साधी सरळ कविता माझ्या तुमच्या लेकींसाठी अधिक सुख मिळूदे भावास म्हणून झटणाऱ्या बहिणींसाठी …. भाऊ जपतो आईला आई त्यांच्या बापाला आईबाप जिवंत ठेवतात लेकींसाठी माहेराला…. माहेराच्या वाटेवरचे काटे कधी बोचत नसतात सासरघरची कळ्या फुले जिवाला जीव लावत असतात…. सासर असतं लेकींसाठी काम धाम करण्यासाठी हातावरच्या रेषांना सुरेख वळण देण्यासाठी….    

  • “पहिला पाऊस” – “PAHILAA PAAOOS”

    पहिला पाऊस पहिलं प्रेम, प्रेम कसलं फसवा गेम. . किती ताणलं धनुष्य तरी, कवी बाळाचा चुकतो नेम… “पहिला पाऊस पहिलं प्रेम” कुणीतरी कवी म्हणतो. . पावसावरती कविता रचत…. कल्पनेतच प्रेम करतो! कवी कल्पना सुंदर असतात ; ह्रुदयमधलं झुंबर असतात !! वारा येतो झुळूक येते . . झुंबर किणकिण गाणे गाते …. कवी वेडा वेडाच असतो,…

  • काय लिहू – KAAY LIHOO

    काय लिहू कसे लिहू प्रश्न मला पडत नाहीत लिहिणे चालू झाल्यावरती शब्द कुठेच अडत नाहीत तीच तीच रडकथा गाणे मला आवडत नाही नवे काही लिहिण्यासाठी आतुर माझे कलम शाई कोण काय अर्थ काढेल याची कधीच पर्वा नसते एका वेगळ्या विश्वामध्ये काव्य माझे झुलत असते भाव दाटतात रूप घेतात लिहित लिहित रंग बरसतात लिहून झाल्यावरती मात्र…

  • धार लावली – DHAAR LAAVALEE

    धार लावली पेन्सिल तासुन पात्याने ब्लेडच्या टोकयंत्र वा गिरमिट फेकुन पात्याने ब्लेडच्या पेन्सिलीतले टोक शिश्याचे तीक्ष्ण जाहल्यावरी तिला पकडुनी लिहिली कविता शुभ्र कागदावरी लिहिता लिहिता अक्षर अक्षर सजीव झाले असे बकुळ फुलांसम सुगंध त्यांचा हृदयी माझ्या वसे बकुळ तळीच्या मातीमध्ये बकुळ शिम्पते फुले परिमल त्यांचा मातीमधुनी वाऱ्यावरती झुले काव्यफुलातिल पराग कोमल रुजूदेत मन्मनी काव्य फुलूदे…