-
झरतृष्ट – ZARATRUSHTA (GOLDEN SHINING STAR)
-
हितकर – HITAKAR (SALUBRIOUS)
-
उखळ – UKHAL (MORTAR)
रदीफ काफियासवे गझल मस्त शोभते तंग जरी काफिया ग वसन चुस्त शोभते सारवान आज नको तूच उंट हाक रे पुनवेची चांदरात ग्रहण गस्त शोभते भेटण्या मला बरी पुलावरील झोपडी महागड्या घराहुनी स्वच्छ स्वस्त शोभते गण मात्रा लगावली तराजूत तोलण्या लष्करची तुला गडे शान शिस्त शोभते हत्तीवर पागोळ्या बसुन बरस बरसती भरला घट उखळ मुसळधार हस्त…
-
स्प्लेंडर – SPLENDOR(GREAT BEAUTY)
झिंग झिंगल्यावरती थिरकत फुगडी सुंदर एक सांडली सोलापूरी बुगडी सुंदर पवन मावळी उद्यम नगरी गाव भोसरी पिंपवडातिल प्राधिकरण अन निगडी सुंदर फेटे टोप्या हेल्मेटच्या गर्दीमध्ये उठून दिसते मस्त पुणेरी पगडी सुंदर शाहूनगरी भटकायाला भारी वाहन जुनी तरीही स्प्लेंडर आहे तगडी सुंदर लेकीबाळी नटून बारामतीत फिरती विकावयाला सुबक बोळकी सुगडी सुंदर मम् गझलेच्या जमिनीवरती पाय रोवुनी…
-
शाल – SHAWL
-
अनुकूल – ANUKOOL (FRIENDLY)
अनुकूलच हे द्रव्य क्षेत्र नि काळही आम्हास भूतकाळही अतीव सुंदर दिसतो बिंबात वर्तमानही जगून सुंदर उजळ भविष्यास दिगंबरांच्या जैन पथावर फुलवू काव्यात सान बालके तरुण पिढीला दिशा दाखवून जिनानुयायांच्या धर्माला नेऊ विश्वात गृहस्थ जीवन जगता जगता मोक्ष पथिक होत निर्भय आम्ही ठेवू तेवत प्रेमाची ज्योत मात्रावृत्त (मात्रा २५)
-
रसोई – RASOEE (KITCHEN)
घरास माझ्या खिडक्या दारे आत वाहते वसंत वारे प्रभात समयी पक्ष्यांसंगे मन म्हणते मज गा रे गा रे बागेमधली फुले पाहुनी काव्य बरसते दरवळणारे अन्न शिजविते रसोईत मी शुद्ध चवीचे आवडणारे अंगणात गप्पांची मैफल सोबतीस मम प्रियजन सारे जिवलग प्रेमाचे शेजारी जणू हासरे भवती तारे घरात तुजला नाही थारा जा दुःखा तू जा रे जा…