Tag: Marathi Kavita

  • टळटळीत – TALHATALHEET

    दुपार आहे टळटळीत चल सई अडगळीत जात्यावरती दळूया घाम थोडा गाळूया शिडी लावून सरसर चढू वर माळ्यावर माळ्यावरची खोकी त्यात घालू डोकी शोधू काहीबाही नको करू घाई दिवा लाव दिवा शोध जुना तवा पूस घसाघसा दिसेल मस्त नवा नको भिऊ बिऊ आला जरी बुवा उघड उघड खिडकी येईल थंड हवा बघ निळ्या आकाशात पाखरांचा थवा

  • सकाळी सकाळी – SAKAALEE SAKAALEE

    सकाळी सकाळी कोंबडा आरवे कडधान्य खाण्या अंगणी पारवे गोठ्यातली म्हैस रवंथ करते रेडकू खुंट्याच्या भवती फिरते सकाळी सकाळी म्हणत भूपाळी आजीबाई फिरे गव्हाळी गव्हाळी वासुदेव येतो नाचत नाचत धान्य ओते माय तयाच्या झोळीत सकाळी सकाळी पूजा मंदिरात अष्टद्रव्य घेते आई तबकात मंदिरात जाई माझी छान आई तिच्यासवे जाण्या किती माझी घाई सकाळी सकाळी मोगऱ्याची फुले…

  • उन्ही उन्हाळा – UNHEE UNHAALAA

    टळटळणाऱ्या मस्त दुपारी ऊन सांडते भरून झारी तशात अवचित सुटते वादळ नयनी ख च्या भरते काजळ पाचोळा उडणारा भिरभिर घरात पंखा फिरतो गरगर नभी कृष्ण जलदांच्या माला म्हणती पाऊस आला आला मेघ गर्जना गडगड गडगड पक्ष्यांची झाडावर बडबड वीज नाचते कडकड कडकड वळवाची सर तडतड तडतड छपरावर उडणाऱ्या गारा अंगणात ओघळती धारा वळचणीस चिमणीची चिवचिव…

  • कातर वेळी – KAATAR VELEE

    दाटन येता स्मृती अंतरी कातर वेळी रडून घे तू मुक्त मोकळे कातर वेळी नकोस दाबू भाव भावना घुसमट होता लाव दिवा तू देवापुढती कातर वेळी बोल मनाशी बोल प्रियेशी बोल फुलांशी सांडुन अश्रू लिहित राहा तू कातर वेळी लिही आणखी फाड हवे तर लिहिलेले तू सुचेल सुंदर अधिक त्याहून कातर वेळी तिन्हीसांजेला संधिकाल म्हण हवे…

  • स्वधर्म – SWADHARM

    मृत्यूनेही मान झुकविली ओशाळून नाही सलाम केला वीरत्वाला झाकोळून नाही मृत्यूंजय तो शंभू राजा वंदू त्या आत्म्याला स्मरणी ठेवू गाथा त्याची जगास कळण्याला धर्म देश अन स्वधर्म जपण्या झुंज दिली त्याने फितूर झाले भ्याड तयांना संपविले त्याने धडा शिकविला त्या भ्याडांना कवटाळून मृत्यू आत्मशत्रूला जिंकत गेला अमर्त्य अमुचा शंभू शिवरायाचा अमर पुत्र हा शिवरायासम शूर…

  • चंद्र सूर्य – CHANDR-SURYA

    सूर्याच्याही आधी उगवे आत्मसूर्य माझा चित्तामधल्या अंधाराची संपविण्या बाधा साधा माझा सूर्य तप्त पण चंद्रासम शीतल आहे चंद्रही माझा शांत शांत पण सूर्यासम तेजस आहे आत्मचंद्र पूर्वेला उगवे पुनवेच्या रात्री अंधाराला करे सुशोभित लहरुन गात्री गात्री चंद्र सूर्य मम दोन नेत्र हे निश्चय अन व्यवहार दो नेत्रांनी बघत बघत मी करेन हा भव पार तटावरी…

  • शीळ – SHEEL

    श्रावणातलया नीळ घनातिल रिमझिम जल बरसे सहज सुटोनी पीळ मनातिल रिमझिम जल बरसे मोरपिसारा फुलवुन नाचे मयुर गवतावरी पडता कानी शीळ बनातिल रिमझिम जल बरसे