Tag: Marathi Kavita

  • वनदेवी – VAN DEVEE

    बकुळ फुलांच्या अगणित राशी तळी साठल्यावरी परिमल जाई वाऱ्यावरुनी वनदेवीच्या घरी वनदेवी मग निघे तरुतळी परिमल प्राशायास सुगंधात त्या वनास अवघ्या भिजवाया भिजण्यास अर्ध्या वाटेवरती भेटे तिज वेडा पाऊस अडवुन तिजला म्हणे मैत्रिणी नको तिथे जाऊस मृदगंधाला लुटून पुरते चल लोळू मातीत खळखळणाऱ्या ओहोळांचे ऐकूया संगीत धारेसंगे खेळत फुगडी दाव निराळा बाज मजेमजेने चरण्यासाठी उन्हात…

  • संशोधन – SANSHODHAN

    संशोधन वा असो माहिती मला न कळलेली आता आता मला मिळाली थोडी जळलेली आवडल्यावर समजुन घेणे ही प्रीती असते अनोळख्याला समजुन घेणे अवघड भलते असते गुणगुणता मी अधरी आली ओळ सहज सहज … भलते सलते अर्थ कशाला डोक्याला ताप … . 

  • आज गाऊ दे – AAJ GAAOODE DE

    आज गाऊ दे मला प्रियतमा मुक्त मनाने काही मला न वाटे भलते काही तुलाच भारी घाई मी न कुणाला पुसले काही मी न कुणावर रुसले वेड्या हट्टापायी माझ्या कुणास ना मी छळले मी माझ्यातच रमले इतुकी आत आत वळले मूर्त तुझी पाहुनी तिथे मी आनंदे रडले काव्यसखीचे बोट धरोनी भवती तुझिया फिरले फिरता फिरता तुला…

  • मुहूर्त – MUHOORAT

    बोलायाचे लिहावयाचे मुहूर्त ठरवे कोणी पोळी भाजी सुद्धा भरवे चमच्याने कोणी नजर सांगते नकोच चमचा अधर घट्ट मिटले उघड पाकळ्या सोड मौन तू अता तरी गझले

  • इडली डोसा – IDALEE DOSAA

    इडली डोसा खमंग आप्पे अथवा सुरळी वड्या नको दाखवुस लालुच असली उघड आतल्या कड्या मनीमाऊला चीज हवे रे तेही ताजे ताजे नकोच उंदिर सोडच त्याला पीसी च्या मागे

  • जय जया जय – JAY JAYAA JAY

    जय जया जय जयघोषाने जय ना होय कधी हर्ष हर्ष हा शब्द जपत रे हर्ष न होय कधी हर्ष व्हावया विजयी व्हाया जप तू प्रीतीला खऱ्या खऱ्या भावना रांगड्या उतरव लढतीला

  • सर्पफणा – SARP-FANAA

    सर्पफणा सावली देतसे तपोलीन मुनीस सिंह म्हणे मी शूर तुझ्यासम वीर क्षत्रियास जलचर जीवा करुन मोकळे नित्यच शंखध्वनी नीलकमल फुल नयन जलातिल नमिते मी त्यांस कासव कणखर मुनी उभयचर सुंदर व्रतधारी पुफ्फ मल्लिगा कुंभातिल जल देई पानांस अर्हतधर्मी व्रती साधुचे अभयदान मीना तृणमय कुंथळ सुरभित गिरिवर बकऱ्या चरण्यास निर्झरकाठी हरिण दौडते शांती रानात वज्रासम धनु…