Tag: Marathi Kavita

  • अवखळ थंडी – AVAKHAL THANDEE

    शिशिरामधली अवखळ थंडी अंगांगाला झोंबत आहे शेकोटीच्या ज्वाळेमध्ये तन मन यौवन नाचत आहे गच्च दाटल्या धुक्यात पक्षी मौन पांघरुन बसला आहे कंठामध्ये अवघडलेल्या गाण्यावरती रुसला आहे पानांवरल्या दवबिंदुंतिल किरण शिरशिरी प्राशत आहे जर्द नव्हाळी गव्हाळ काया उन्हास हळदी माखत आहे सुरभित पुष्पे देहावरती भिजली माती झेलत आहे सरत्या वर्षामधले काही सुंदर क्षण मी वेचत आहे…

  • श्रमण – SHRAMAN

    पूर्व प्रसिद्धी -मासिक महापुरुष, दीपावली विशेषांक, वर्ष ८वे, पुष्प १-२, ऑक्टोबर- नोव्हेंबर, २०१४ श्रमात रमती मनापासुनी जे जे त्यांना श्रमण म्हणावे, वीज बनविण्या साठविती जल म्हणून त्यांना धरण म्हणावे। वीज खेळवित तनामनातुन भावांचे नित मंथन करुनी, हृदयजली जिनबिंब पाहती त्यांना ब्राम्हण रमण म्हणावे। तीर्थंकर वाणीतिल कणकण टिपण्यासाठी धर्मसभा जी, बारा भागांमध्ये शोभीत तिजला समवशरण म्हणावे।…

  • तीन तेरा – TEEN TERAA

    तीन तेरा तीन तेरा वाजलेरे कुंडल्यांचे बारा वाजलेरे मेळावे रंगीत भाषण  संगीत चर्चेत सारे रंगलेरे तीन तेरा तीन तेरा वाजलेरे सकाळचा नाश्ता शाकाहारी पास्ता चहा नि जेवण झालेरे तीन तेरा तीन तेरा वाजलेरे फोनही केले इमेल केले लग्नाचे तरी न जमलेरे तीन तेरा तीन तेरा वाजलेरे

  • वाजले बारा – VAAJALE BAARAA

    बघ वाजले बारा अता वाजवु तिन तेरा अता धादांत खोटे बोलणारे मौन का झालेत सारे काटा पुढे सरके पळे अज्ञानही सरुनी गळे आता तरी बोला खरे जपण्यास अपुली पाखरे ही पाखरे फुलपाखरे अपुलीच जणु ही लेकरे भय सोडुनी मत नोंदवा अधिकार आहे गाजवा या तोडुया कारा अता प्या मुक्त हा वारा अता

  • सोन्याचा शिंपला – SONYAACHAA SHIMPALAA

    एक तुला मी दिला शिंपला सोन्याचा शिंपला दवबिंदूंना झेलायाला सोन्याचा शिंपला दोन शिंपले मिळून बनते हृदय आपुले जरी उघड शिंपला अलगद वरचा हो पंखांची परी दोन शिंपले दोन दलांसम घे तू पाठीवरी होउन खग मग घेच भरारी निळ्या घनांच्यावरी हृदयामधल्या दवबिंदूचे मोती उधळित जा पडतील मोती जेथे जेथे अमृत शिंपित जा येतील वरती मातीमधुनी मोत्यांची…

  • पर्व पर्युषण – PARVA PARYUSHAN

    भाद्रपदातिल शुक्ल पंचमीस पर्व पर्युषण येते खास तिथिस या नेमाने मग प्रियची आठवण येते प्रिय म्हणजे जो हृदयी वसतो व्यर्थ न भटकत बसतो धर्म अहिंसा स्थापित करण्या मनामधे अवतरतो देवघराचा मोह न प्रियला प्रियवर मोहित सैनी पुण्यभूवरी प्रियसाठी नव मंदिर बांधे जैनी क्षमा मार्दवे जीव शोभतो आर्जव सुवर्ण कंकण देह शुद्ध अन हृदयी शुचिता हे…

  • गझलसदृश्य – GAZAL SADRUSHYA

    जर्द रवीला जाळ म्हणूया भडक फुलांची दुशाल म्हणुया करे प्रदर्शन दानाचे जी तिजला बोली सवाल म्हणुया स्वच्छ मनाचे मुलगे जे जे त्या मुलग्यांना बाल म्हणूया पक्षपात जो कधी न करतो त्याला सुंदर काल म्हणूया कटकट मोडे त्या काष्ठाला मस्त भिजोनी वाळ म्हणूया जीव जीवाला जीवच म्हणतो पुदगलास पण माल म्हणूया सिंहकटीसम कमर जिची तिज चाळ…