-
परडी – PARADEE
काव्यपरीचे, चरण पकडुनी, प्राप्त जाहले, सौख्याला; निंदा गर्हा, करुन स्वतःची, फक्त शरण मम, आत्म्याला.. तळ गाठाया, आत्मसागरी, उतरत गेले, खोल खरी; तटस्थ राहुन, निरखित गेले, भोवतालची, मूक दरी.. गांभीर्याने, अन धीराने, दिवा उजळिता, गाभारी; श्रद्धापूर्वक, मिटल्या नेत्री, मी जीवाची, आभारी.. भिऊन ज्यासी, बंद कवाडी, कोंडत गेले, काव्याला; ती भीती भय, सुंदर मम सय, पहा कळाले,…
-
गंडोला – GANDOLAA
फिरतो घुमतो तो गंडोला नको बावरू तू चंडोला पाय रोवुनी पकड गजाला करीत किलबिल बघत हिमाला येता थांबा हळू उतर रे पंख धवल तव उडत पसर रे गाठ मंदिरा निळ्या अंबरी स्वागत करतिल मरुत सुंदरी पिंड शिवाची बर्फामधली तुझ्याचसाठी सजली हसली नाद अनाहत अनुभूतीचा भरल्या हृदयी ऐक खऱ्याचा ब्रम्ह दर्शना साठव नेत्री परतून ये मग…
-
चल चल भिंगू – CHAL CHAL BHINGOO
चल चल भिंगू म्हणत म्हणत हा फिरे गरारा वारा नका नका रे नावगाव पुसु असो मतलई खारा ताप तापते ऊन उकळते वरवर चढतो पारा हलके हलके सरसर येती भरभर तडतड गारा अंगांगावर रोम शहारा घळघळ सरसरणारा थेंबामध्ये चिंब बिंब तन झेल झेलते धारा भुरे पाखरू किलबिल करुनी तोडे फोडे कारा हूड वासरू चरते खाते हिरवा…
-
तो नाही अन ती नाही – TO NAAHEE AN TEE NAAHEE
कशास गाणे लिहू अता मी वाचायाला तो नाही खरी समीक्षा करू कशाची जाणायाला ती नाही कशास वाटा चालू आता वाट बघाया तो नाही अवघड वळणे कशास घेऊ वळणावरती ती नाही खिदळत नाचत गाऊ कशाला ऐकायाला तो नाही कशास खुडू मी जुई मोगरा गजरा करण्या ती नाही कशास अश्रू ढाळू आता रुमाल देण्या तो नाही चुका…
-
शब्दांजली – SHABDAANJALEE
खाणदेश अन विदर्भ कोकण मावळ घाट नि मराठवाडा सह्याद्री अन सातपुड्यावर मजेत उडती बलाक माला जिवंत आहे शिल्प अजंठा अन वेरूळची कोरीव लेणी रायगडावर अजून घुमते शिवरायांची अमोघ वाणी धर्मवीरांची शांत गुरुकुले कर्मवीरांची धर्म साधना स्वर्ग कराया या भूमीचा अज्ञानाशी युद्ध सामना पुत्र येथला ऐसा गुंडा घटना लिहितो या देशाची किमया करिती इथे महात्मे स्त्रीशक्तीला…
-
मनभावन सृष्टी – MANBHAAVAN SRUSHTEE
मी कविता अन मी कवयित्री प्रतिभा मम आई विषय न कुठला वर्ज्य असे मज मी ठाई ठाई नकाच घालू मज अंगावर प्रासांचे दागिने पुरे जाहली सक्ती ऐश्या वृत्तातच उडणे नकाच शोधू माझ्यामध्ये जड जड प्रवृत्ती स्वच्छंदी मी चंडोलासम निर्भर मम वृत्ती चैतन्याला उडव उडवण्या मनभावन सृष्टी गाज अंतरी गर्जायाला प्रेमाची वृष्टी लिहिता लिहिता उसळत नाचत…
-
साखर झोप – SAAKHAR ZOP
कोकिळ गाई पहाट गाणे साखर झोपी तरल तराणे स्वप्न पाहती कुणी दिवाणे जगण्यामधले ताणे बाणे कवीच करतो त्यास शहाणे मुदित होऊनी शीक पहाणे आणिक हल्लक होत वहाणे नको करू रे व्यर्थ कुटाणे विक हवे तर चणे फुटाणे गाता गाता जीवन गाणे