-
शब्दांजली – SHABDAANJALEE
खाणदेश अन विदर्भ कोकण मावळ घाट नि मराठवाडा सह्याद्री अन सातपुड्यावर मजेत उडती बलाक माला जिवंत आहे शिल्प अजंठा अन वेरूळची कोरीव लेणी रायगडावर अजून घुमते शिवरायांची अमोघ वाणी धर्मवीरांची शांत गुरुकुले कर्मवीरांची धर्म साधना स्वर्ग कराया या भूमीचा अज्ञानाशी युद्ध सामना पुत्र येथला ऐसा गुंडा घटना लिहितो या देशाची किमया करिती इथे महात्मे स्त्रीशक्तीला…
-
मनभावन सृष्टी – MANBHAAVAN SRUSHTEE
मी कविता अन मी कवयित्री प्रतिभा मम आई विषय न कुठला वर्ज्य असे मज मी ठाई ठाई नकाच घालू मज अंगावर प्रासांचे दागिने पुरे जाहली सक्ती ऐश्या वृत्तातच उडणे नकाच शोधू माझ्यामध्ये जड जड प्रवृत्ती स्वच्छंदी मी चंडोलासम निर्भर मम वृत्ती चैतन्याला उडव उडवण्या मनभावन सृष्टी गाज अंतरी गर्जायाला प्रेमाची वृष्टी लिहिता लिहिता उसळत नाचत…
-
साखर झोप – SAAKHAR ZOP
कोकिळ गाई पहाट गाणे साखर झोपी तरल तराणे स्वप्न पाहती कुणी दिवाणे जगण्यामधले ताणे बाणे कवीच करतो त्यास शहाणे मुदित होऊनी शीक पहाणे आणिक हल्लक होत वहाणे नको करू रे व्यर्थ कुटाणे विक हवे तर चणे फुटाणे गाता गाता जीवन गाणे
-
टक्के टोणपे – TAKKE TONAPE
खा टोणपे नि टक्के उडवून लाव धक्के कर काम तू अता रे जप ओळखी स्वतः रे कोणास कोण तारी अपुल्याच त्या सतारी आहेत खूप भारी
-
ऊन काहिली – UOON KAHILEE
ऊन काहिली थंड कराया पाऊस गाणी झरती चला जाऊया सैर कराया डोंगर माथ्यावरती कुदळ फावडे घेऊन हाती हात आमुचे खणती तण उपटूया खड्डे करूया खांब रोवण्यासाठी भूमी मापन अचुक करूया घेऊन हाती काठी घाम गाळूया माती भरुया धावू वाऱ्यापाठी मडके भरुया सडा शिंपुया जमीन करण्या ओली लांबी रुंदी उंचीसंगे भरून टाकू खोली कुंपण गर्द कराया…
-
तिरंगा – TIRANGAA
अधरांवरती असेल शिट्टी हातामध्ये घड्याळ झाडू अचूक समयी भारतभूवर भ्रष्टाचारा उखडू जाळू खांद्यावरती धनुष शिवाचे भात्यामध्ये बाण अक्षरी हृदयमंदिरी सदा तिरंगा हीच असूदे सही स्वाक्षरी तळ्यात कमळे बघत धावते इंजिन पाठी झुकझुक गाडी दिडदा दिडदा गात फुलविते शेतमळे अन हिरवी झाडी स्वार्थांधांना धूळ चारण्या मानव सारे एक होउया जीव शृंखला टिकण्यासाठी आत्म्याचे संगीत ऐकुया स्वभाव…
-
स्वातंत्र्य दिवस – SWAATANTRYA DIVAS
मी जेंव्हा पाखरू होते तेंव्हा झाडावर राहायचे आणि सतत बडबडायचे कारण तेंव्हा मला लिहिता येत नव्हते… पण जेंव्हा मी पक्षी बनले तेंव्हा मी झाडावरून खाली उतरले मग मी या झाडावरून त्या झाडावर इकडे तिकडे चोहीकडे उडायला लागले… मग मला वाचता पण यायला लागले मग मी गप्पीष्ट झाले मी निवांत गप्पा मारू लागले पाखरांशी पक्ष्यांशी खगांशी…