-
आठवण – AATHAVAN
Aathavan means memory. Here poetess tells us about her sweet memory. तुझी म्हणाया नको वाटले म्हणून तिजला निळी म्हणाले निळी जाहल्यावरती तिजला किती किती तू खुळी म्हणाले खुळी जाहल्यावरती वेडी सैरावैरा पळू लागली आवरता तो नाच तिचा मग गात्रे माझी थकू लागली आठवण जरी ती तुझीच होती कैक आठवणी गाऊ लागल्या रंगबिरंगी हार बनूनी गळ्यात…
-
प्रिया सावळी – PRIYAA SAAVALEE
स्वमग्न नाही आत्ममग्न मी काव्यामध्ये स्वात्ममग्न मी प्रिया सावळी सुंदर शुभ्रा कधी कधी परमात्ममग्न मी
-
सोहमच्या ध्यानात रमूदे – SOHAMCHYAA DHYAANAAT RAMOODE
In this poem the poetess says, I want to recite my soul’s inner voice,’Soham! Soham!Soham!… Soham is a feeling that arises in mind or heart when you know who you are. कण कण खिरता मोह असूदे विरहाग्निचा दाह असूदे दिवस असूदे माह असूदे नववर्षाचा प्रवाह असूदे जीवाचा उन्मेष असूदे मीरेचा तो कृष्ण असूदे क्षमस्व अथवा…
-
शारदीय सप्तसूर – SHAARADIYA SAPTASOOR
In this poem the poetess describes pleasant atmosphere and state of our mind in various seasons. आत्ममग्न शिशिराला जागविते ध्यानातून वसंताची प्रीत गाते कोकिळेच्या कंठातून केतकीच्या गर्भापरी हेमंत हा सोनसळी ग्रीष्म सखी तापवूनी बुडविते सांज जळी मेघदूत आषाढाचे नभातील खगांपरी उत्तरीय काळेनिळे उडे बघ वाऱ्यावरी धारा झरे झरझर बागडते जलपरी वीज तेज कडाडते आकाशाच्या पटावरी…
-
तरू प्रीतिचे – TAROO PREETICHE
In this poem the poetess says, today my mind became very very soft, fragnant and cool. आज किती मी कोमल बनले शीतल आणिक सुरभित बनले दवात भिजवुनी शुष्क पाकळ्या सुगंधीत मी फूल बनविले शुभ्र गुणांचे बीज पेरले मातीमध्ये अर्थ मिसळले भावजलाने त्यास शिंपले तरू प्रीतिचे वरती आले पर्ण फुलांनी बहरून गेले मांडव घालुन जाळीदार मी स्वतःच…
-
असावी तर अशी – ASAAVEE TAR ASHEE
In this poem the poetess describes features and qualities of her poem. असावी तर अशी-कविता माझी कशी देह नाचरा मोर डोळे काळेभोर कान कपाचा धरी-किणकिणणारी बशी पुरणपोळीसम गोड आंब्याची जणु फोड भातावरती गरम-साजुक तूप जशी अधरी पावा धरी उडणारी ती परी झोप सुखाची येण्या-मृदू पिसांची उशी
-
शुभ्र पंख – SHUBHRA PANKH
In this poem the poetess describes the earth and nature when rain comes. पावसात न्हातिल पक्षी चिंब चिंब होत सुकवतील शुभ्र पंख कोवळ्या उन्हात पुष्पगंध नेत शीळ घालतो ग वात लक्ष लक्ष झुलतिल घरटी गर्द वाटिकेत मृत्तिकेत उगवतिल हरित पीत हात क्षितिजावर इंद्रधनुत रंग सहा सात