Tag: Marathi Kavita

  • ऐक उखाणे हे माझे – AIK UKHANE HE MAZE (“listen to this riddle of mine”)

    अनवट कोडे नकोस घालू ऐक उखाणे हे माझे ऐकशील तर सुटेल कोडे गाशील गाणे तू माझे माझे माझे म्हणशिल तर ते खरेच होइल तुझेच रे तुझ्यासवे मी गाताना ते म्हणतिल सारे हे अमुचे ऐकत ऐकत गात नाचतिल कैक दिवाणे ते अपुले अनवट कोडे तुझे न माझे खरेच सजणा हे माझे नाव गुंफले ज्यात आपुले ऐक…

  • अक्षर माझे – AKSHAR MAZE (my handwriting)

    वाटुन पाला मी मेंदीचा तळहातांना रंगविले जास्वंदीच्या चुरुन पाकळ्या गालांना मी रंग दिले तेल तुपाची धरुन काजळी नेत्र पाकळ्या लांबविल्या विडा चघळुनी त्रयोदशगुणी अधर पाकळ्या खुलविल्या जाइजुईचा गजरा गुंफुन सुवासिक मम कुंतल झाले निशिगंधाचा सुगंध प्राशुन तनमन अवघे पुलकित झाले शुभ्र मोगरा हिरवा चाफा भूचंपक तो जर्द जांभळा दौतीमध्ये भरण्या शाई प्राजक्तासम टपटप झरला मोरपिसाची…

  • ध्रुव तारा – DHRUVA TARA (pole star)

    कैकवेळा नाव लिहिले खोडलेही कैकदा पण पहाटे साद घाली ध्रुव तारा हासरा मी कधी होते तुझी अन मी कधी माझीच रे गुंतले नावात होते मी तशी साधीचरे नाव असुदे गाव असुदे गुंतलेली वासना आत्मियाशी फक्त जोडे शुद्ध सुंदर भावना मुग्धता प्रेमातली वा धुंद लाटा सागरी स्वर्ग मी हिंडून येते घेत त्या अंगावरी आज मी आहे…

  • काव्यमळा – KAVYAMALA (Garden of poetry)

    तुझे घेत आहे काही तुला देत आहे काही ।। मृदू पालवीने फुलतो पुन्हा पुन्हा फळतो रमतो नवे येत आहे काही तुला देत आहे काही… अंगणात नाचे वारे उघड खिडक्या सर्व दारे प्रेम नेत आहे काही तुला देत आहे काही… पाजु पाणी तरू रोपा बांधुयात घरटे खोपा वाळु रेत आहे काही तुला देत आहे काही… काव्यमळा…

  • वसंत गीत – VASANT GEET (happy season’s song)

    माघ फाल्गुनी वसंत वारे कृष्ण अंबरी अनंत तारे आम्रतरू गुलमोहर फुलतो बहर जोवरी तोवर झुलतो पक्षी उडती दिगंत सारे चैत्र उन्हाची रंग पंचमी गाते सरिता दंग संगमी गीत तिला जे पसंत गारे ग्रीष्म काहिली येथे तगमग सहा ऋतुंची जेथे लगबग घेण्या अंमळ उसंत यारे मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)

  • धागा – DHAAGAA (thread)

    काळ्या मातीमधली धवला नाजुक साजुक कपास आणू साध्या यंत्रावरती हलके कोमल कणखर दोरा बनवू वळून दोरे हातावरती अखंड मजबुत धागा घडवू मृद्गंधासम बकुळ फुलांच्या अर्कामध्ये त्याला बुडवू जास्वंदीच्या चुरुन पाकळ्या कुंकुमवर्णी रंगी भिजवू सुकवुन धागा पीत सुवासिक शेवंतीची फांती गुंफू सुई कशाला फुले गुंफण्या कुशल अंगुली आपण वळवू

  • जाण – JAAN (understanding)

    कर्तव्याचे भान असूदे हक्क मागताना खरेपणाची जाण दिसूदे  भाव तोलताना स्याद्वादाची दृष्टी असूदे अर्थ लावताना व्यवहारातिल चोखपणाला व्यवहाराने जाणा व्यवहारातिल निश्चय जपण्या ताठ असावा बाणा ताठ असावा कणा बुद्धिचा परी नच ताठर रे ममतेच्या पातीची त्यावर घालू पाखर रे लेखणीची वा तलवारीची जात इमानी खरी जीवातिल चैतन्य टिपाया लढते धरेवरी लढता लढता पडेल अथवा मरेल…