Tag: Marathi Kavita

  • ठिणगी – THINAGI (the spark)

    ठिणगी पडण्या गार घासुया गारेवरती निखार फुलण्या फुंकर घालू जाळावरती वात टिकाया वात वळूया हातावरती ज्योत तेवण्या ओंजळ धरुया समईवरती फूल जपाया देह तोलुया काट्यावरती प्रेम जिंकण्या शौच धरूया सत्यावरती राध उजळण्या कषाय जाळू अग्नीवरती मात्रावृत्त(८+८+८=२४ मात्रा)

  • पदपथ – PADPATH (footpath)

    पौषामधली पहाट माझ्या मनात नीतळ  गाणे गाते मम आईच्या मृदुल मनाची झुळूक शीतल गाणे गाते मुग्ध गारवा सुखद शहारा अंगागाला स्पर्शून जाता मौनी पदपथ अविचल तारे निश्चल सळसळ गाणे गाते असशिल कोठे ठाऊक नाही तरी कल्पना मनी खेळते निवांत वेळी शांत एकटा गाठुन तरुतळ गाणे गाते

  • कालवा – KALAVA (THE CANAL)

    केळी द्राक्षे दहिभाताचा धाड गारवा तोलायाला वजने मापे एक ताजवा बसून जेवण करण्यासाठी अंथर चटई असेल जेथे थंड जलाचा स्वच्छ कालवा मिरचीठेचा उसळ मुगाची झुणका भाकर चवीचवीने खाइल चिमणी द्वाड पारवा गाजर-हलवा चिक्की बर्फी पानसुपारी देउन तिळगुळ नात्यांमधला जपू गोडवा किलबिल करतिल मुले पाखरे झाडांभवती फुलेल मोहक कळ्याफुलांचा शुभ्र ताटवा

  • कनक कस्तुरी – KANAK KASTUREE (golden musk)

    कनक कस्तुरी उधळुन गेली, आई माझी मुक्ती रमणी कोमल सुमने फुलवुन गेली, आई माझी मुक्ती रमणी स्वर्गामधले विमान पुष्पक, घेउन येता माझे दादा दवबिंदुंना माळुन गेली, आई माझी मुक्ती रमणी अनेक कन्या पुत्र तिचे प्रिय, दादा पण तिज, प्राणाहुन प्रिय त्यांच्या वाटा शोधुन गेली, आई माझी मुक्ती रमणी गझला कविता कथा समीक्षा, हृदयापासुन तिने जाणल्या…

  • सोने खरे रे – SONE KHARE RE (real gold)

    सोपे दिसे रे अनवट कसे रे कोडे पडे रे नाते नवे रे नकळत फुले रे व्हावे खुले रे आहे जुने रे अवघड कुठे रे सोने खरे रे मात्रावृत्त (४+३+२=९ मात्रा)

  • कोंडा – KONDA (bran or husk of grain)

    कोंडा मळ तू बडव बडव तू मांडे तळ तू वाती वळ तू तबक सजव तू पूजा कर तू पक्षी बन तू किलबिल कर तू गाणे म्हण तू मात्रावृत्त(४+२+२=८ मात्रा)

  • धोंडा होते मी – DHONDAA HOTE MEE (I was completely numb)

    पारा होते मी बघ ओघळले मी धारा झाले मी किल्ला होते मी पडले झडले मी पाया झाले मी कारा होते मी तुटले फुटले मी वारा झाले मी तारा होते मी चपला बनले मी उल्का झाले मी ओढा होते मी भिजले भरले मी दाता झाले मी काया होते मी हसणे शिकले मी आत्मा झाले मी साकी…