-
टाळी – TALHEE(APPLAUSE)
वाऱ्याच्या वेगे आभाळी घन वर्षाया येती डोंगर माथ्यावर विश्रांती जमून येण्या घेती पश्चिम क्षितिजी केशरकांडी कृष्ण ढगांतुन फिरता संधीकाली सूर्यास्ताची घटिका उधळे रेती अधिकामधला वाण पाऊस फोडुन वादळ येता कडाडणाऱ्या जलद मेघना विजेस टाळी देती मुसळधार जलधारा शीतल थेम्ब टपोरे मोती संशय शंका धो धो धुवुनी शुभ भाव फळे देती रत्नत्रयमय ज्ञान संपदा पुरुषार्थाची जादू…
-
मुखडा – MUKHADA(FACE)
शुभाशुभाची वर्दळ वावर न्याहाळू अंतरा शुद्ध भाव राहण्यास स्थावर प्रक्षाळू अंतरा मुखडा आणिक अंतऱ्यातला फरक जाणल्यावरी हलके हलके मिटेल अंतर सांभाळू अंतरा गझलेमधला रदीफ जैसा पुन्हा पुन्हा येतसे ऐसा जणू तो मुखडा वत्सल मायाळू अंतरा गझलियतीसह काफियातील अलामतीचा मणी चित्रांकित रत्नत्रय हृदयी गंधाळू अंतरा हिऱ्याप्रमाणे नाव झळकते सोन्याच्या कोंदणी पुरुषार्थाच्या दली उमलतो लाजाळू अंतरा
-
नीव – NEEV(BASE)
-
कथा – KATHA(STORY)
कुठे जायचे ते मला वाट सांगे कितीदा वळावे निळा घाट सांगे फुले जांभळी वेचण्या वात शीतल कळीची खळी चुंबण्या लाट सांगे तरल आवडी सावळ्या तव कळाल्या सुखाने तुला जेवण्या ताट सांगे गुणांशी करायास व्यापार पक्का सदाचार माळू हळू धाट सांगे जरी पायवाटा उन्हाने जळाल्या बरसण्या सरळ जळ वळ चऱ्हाट सांगे पहाटे भिजूनी तळी चिंब पाने …
-
पूज्य – PUJYA(VENERABLE)
शांत चित्त व्हावयास जपेन अंतरी जिनास निसर्गात ईश्वरास जपेन अंतरी जिनास जाप द्यावयास नित्य स्मरेन मूर्त वीतराग शुद्ध भाव आस ध्यास जपेन अंतरी जिनास काय वचन आर्जवात जिनालयात आसनात क्रोध लोभ त्यागण्यास जपेन अंतरी जिनास अंतरंग मार्दवात धरेन नाम पूज्य सिद्ध शौच सत्य संयमास जपेन अंतरी जिनास गोष्ट आगमातली जुळवून ठेवली मनात सत्य सार जाणण्यास…
-
ग्रंथ – GRANTH(TREATISE)
ग्रंथ चेहरा भिंत बोलकी आभाळ सजल घन कृष्ण फळा धुंवाधार जलदांतुन मोती गाळिव जल धारोष्ण झळा अक्षरगण अन मात्रा वृत्ते ना पोरखेळ ही गझल विधा गझलियतेवर तरे लीलया तन तहानलेला हरित मळा शब्दकोश मम मुक्त उधळुनी भरून वाहते कोषागार ओंजळ सांडे करकमलांची लागल्या जिवा निर्मिती कळा निःकाचित कर्मे जाळाया ध्यानाग्नीने पेटव समई धर्म अहिंसा संयमात…
-
कासंडी – KASANDI(ROUND POT)
उकाडा उन्हाळी हंडी गव्हाळी भरायास ओंब्या थंडी गव्हाळी गुलाबात लाली धवल हळदुली झगा पाकळ्यांचा गुंडी गव्हाळी जिनांचा कराया प्रक्षाळ ज्येष्ठी जलाची नभी कासंडी गव्हाळी धडा काळ शिकवे वेळेप्रमाणे पुन्हा प्रकटता पाखंडी गव्हाळी गुणी अर्भकाची कुंची गुलाबी तरल अभ्रकासम बंडी गव्हाळी जसे पुत्र तैश्या कन्या करारी कशी मुरगळीशी मुंडी गव्हाळी उसाच्या फडावर नागीण कृष्णा रसा शांतला…