Tag: Marathi sahitya

  • रंग फाल्गुनी – RANG FALGUNI

    मने हरित जाहली खरी खुलून गावया वनात बहर लीलया पुन्हा वसंत गावया रंग फाल्गुनी झरे फुलाफुलांत उतरण्या सुगंध पाकळ्यांतला हवेत मंद लहरण्या गात पाखरे झरे मनास नाद मोह तो पान पान मोहरात आम्रवृक्ष डोलतो वादनात गायनात सृष्टी रंग दंगली मने फुलून रंगली… मने फुलून रंगली … .

  • गरिमाधुर्य – GARIMAADHURYA

    गरिमाधुर्य.. अधरी धरी .. री हरी … अधरी धरी… . बासुरी धन्वंतरी री हरी.. अधरी धरी ….. पांगलेल्या सावल्यांची .. भाषणे भाषांतरे ….. छापावया शाई भरी.. री हरी अधरी धरी….. कुरणावरी गाई म्हशी ..घुंगरे कंठातली ….. शांत समयी झरण्या सरी .. री हरी अधरी धरी….. रेष आभाळात काळी.. पाखरांची चालली ….. प्रतिबिंब हलते निर्झरी.. री…

  • मानधन – MAANDHAN

    मौन मानस मोर माथ्यावर मुरारी मुसळ माळा मुघल माया नर मुरारी डौल तोरा मर्दिनी तव नर्तकीचा मूठ मारुन मूळ मंथन कर मुरारी कोसळे नक्षत्र कुठले मज तमा ना मोरपंखी मलय मानक हर मुरारी ना धरी धारेवरी गुण व्यर्थ कोणा मायबोली माधवी मोहर मुरारी निर्मितीचा कलश भरता सहज झेले मोरचूदी मारव्याचा स्वर मुरारी वेड झरणारे सुगंधी…

  • हेर – HER

    थबकुनी अंदाज घेतो शेर माझा मोजते आता खुशीने घेर माझा ऐक आई घागरींचा नाद भूवर वारियाने संपवीला केर माझा पुण्यनगरी मावळी शिवसैन्य लढले ग्राम मोठे देश तो बाणेर माझा खोदतो भूमी तराई शास्त्र मिळण्या गुप्ततेने गस्त घालत हेर माझा वावरे गझली “सुनेत्रा” शुद्ध आतम ढंग चाळे विकृती ना थेर माझा

  • आत्मशुद्धी – ATMSHUDHDEE

    आत्मशुद्धी मम ! काव्यचित्र मी सहज रेखले शब्दांमधुनी ……… काव्यार्थातील ……… भावजलातून ……… आत्मशुद्धी मम ……… प्रेम सलोखा ! समाज मंदिर ! प्रकाश परिमल ! जिनालयातील ! भावजलातून ! आत्मशुद्धी मम ! !

  • आरतोळी – AARTOLI

    आकडे मोजून थकवे सहज कोणी मांजरांना काय शिकवे सहज कोणी उजळणी पुन्हा कराया वर्तमानी भूतकाळा देय लकवे सहज कोणी वट तुझा काहून फिक्का वाटला रे वटवटीने चित्त पकवे सहज कोणी काळ गेला काळ आला काळ येई शीतकाली आम्र पिकवे सहज कोणी आरतोळीतील विझते ज्योत जेंव्हा पेटवूनी तीस झुकवे सहज कोणी मार्गदर्शक दगड मैलाचे बनाया जाहले…

  • चमत्कार – CHAMTKAAR

    डबघाईचे दुकान माझे तरून आले डबडबुनी दो अतिशय डोळे भरून आले चमत्कार बघ कैसा झाला पंचम काली डबडे बडवत अजाण बालक वरून आले विपर्यास का कुणी करावा अर्थ लागण्या डब घालाया घासुन भांडी घरून आले एक पाहुणा जेव्हा आला मुक्कामाला डबल बेडचे सिंगल झटपट करून आले इंग्लीश हिंदी आणि कन्नड बोल “सुनेत्रा ” डबरा भरण्या…