-
धग – DHAG
जाहले चरबट आच रे कर सोसुनी धग खले पाथरवट काच रे पर चोरुनी धग माठ फोडूनी टाकले कचऱ्यात खापर वळले आचरट जाच रे धर राखुनी धग तीर कमठा खांद्यावरी घेऊन निघता दले मारुन कट का चरे शर लाटुनी धग जीव मी जगवुनी जगे सत्यास स्थापुन थांबले धुरकट नाच रे हर गर्जुनी धग “सुनेत्रा” अक्षररंग उधळे…
-
नवकळ – NAVKAL
फटकळ मी तण कळ मी सळसळते अटकळ मी टपटप ती कळकळ मी झटपट झी मरकळ मी झरझरता नळ कळ मी बरहमणी भट कळ मी फिरव जरा नट कळ मी उघड हळू घटकळ मी नमन जिना नवकळ मी
-
वाईच – VAICH
वाईच ….. एक मुक्तक ! वाईच शब्दामधल्या ‘च’ चा अर्थ अल्पसा वाईच शब्दांमधील ‘च’ हा नसे भरीचा महाबळेश्वर सवे पाटण निसर्ग सुंदर ,,,, वाईच फक्त न .. जावळीसह मेढासुद्धा !!!
-
बाईजामा – BAI JAMA
चौकी माझी माझी आई मायबोली ग कन्नड ताई मी जाणे रे कर्मबंध मम हांवि न मजवर मोही राई जळते ज्याचे त्याला कळते फुकट कशाला जाळू शाई विविध बोल पण साद घालते मॉमी मम्मी मैय्या माई तलम ओढणी निळसर अंबर मुक्त चांदण्या ठायी ठाई माय जिजाऊ येऊ अव्वा स्वराज्य स्थापुन गाणे गाई बाईजामा अम्मा साध्वी टाळ “सुनेत्रा”…
-
डंका – DANKAA
चंपक चाफा हिरवा पिवळा दरवळ नाही लपत गडे चंचल चपला ढगात शिरुनी कुपीस फोडे छपत गडे डंका दंडकारण्याचा त्रिलोकात दुमदुमे सई गज़ल सयी मम उभ्या ठाकल्या थेट बघत वर तपत गडे चपळ चपल हरिणीसम धावत जलद निघाले वर्षाया निळ्या सपाता गळून पडल्या पावलांस घन जपत गडे वेग झपाटा झपाटलेला लगबग घाई सळसळती ऊन सावली संगे…
-
चौघडा
घन काळे काळे गगनी भादवा दवा आत्म्याला चिरि कुंकू रेख ललाटी दे जाप्य काव्य कुसुमाला जोडून करांचे तळवे जुळविली कराग्रे दाही मी भाव अर्घ्य दिधले पारणा व्रताची झाली निळीशार हवेली मौन रानभर सळसळे ऊस कलशात खिराया दहिवर थांबला जलद पाऊस किरणांनी जादू केली निवळली धुक्याची दुलई सृष्टीशी गप्पा गोष्टी झंकार चौघडा सनई
-
कारवा – KAARVAA
दोन प्रहरी घे विसावा मारवा टाळू गडे कोळशाच्या शेगडीवर सार वाफाळू गडे ऊन आले बागडाया परसदारी अंगणी थांबल्या पाऊस धारा गारवा गाळू गडे घार भांडिक मोर शामा अन गवय्या गावया पाखरांना घाल दाणे पारवा पाळू गडे जाहली मळणी उफफणी ये भरू पोटी नवी बोर पपई ऊस चोरा खा रवा चाळू गडे वाळवंटी कारखाना चालवाया रेतिचा…