Tag: Marathi sahitya

  • कुंचला – KUNCHALAA (PAINTBRUSH)

    करी कुंचला सहज घेऊनी… रंगामध्ये पूर्ण बुडवूनी… सहज सहज फटकारे मारून … चित्र एक साकारे त्यातून… भिजव भिजवले त्यास चिंबूनी … रंगांवरती रंग उडवूनी … भिजला कागद… भिजली पाने… नवरंगांनी सजली पाने… अनेकान्त भावांची किमया… जणु पौषाची धारा तनया …. रंग आप अन भाव मनातील … करी उतरता …भिजतो कागद… सुकतो… भिजतो… पानावरती चित्र उमटते……

  • चरखा – CHARKHAA (SPINNING WHEEL)

    न पिते न खाते का बाई हरवून जाते का बाई चरखा फिरवुनी सूत जमे तेंही न काते का बाई पाऊस येता शब्दांना विसरून गाते का बाई फसवून पळवे प्रीतीला फिरवून नाते का बाई फिरवीत बसते कलम नवे घासून पाते का बाई

  • सुखांत – SUKHANT (HAPPY ENDING)

    नखशिखांत मी यशात न्हाले मज न भ्रांत मी यशात न्हाले गीत लिहितसे स्वतंत्रतेचे हृदय प्रांत मी यशात न्हाले उदकचंदनी नऊ रसांसह तिप्प शांत मी यशात न्हाले मेघ जलद वा बनून जलधर घन सुखांत मी यशात न्हाले रंगवून मम अलक सुनेत्रा गझलकान्त मी यशात न्हाले शब्दार्थ तिप्प – तृप्त सुखांत – सुखी शेवट अलक – अती…

  • मोतीमाळ – MOTEE MAAL( PEARL NECKLACE)

    लिहावी वाटते जेंव्हा कविता .. तेव्हाच लिहावी असं काही नाही कामे करता करताही लिहावी कविता एखादी .. किंवा रस्त्यातून चालता चालताही …. लिहावी एखादी कविता.. कामे असतातच निकडीची …रोज रोजच्या जगण्याची… ती तर करायलं हवीतच आधी… त्यानंतर मग… लिहावीच एखादी मुग्ध कविता… वेळ काढून …मूड पाहून.. साठलेल्या भिजलेल्या शब्दांतून ,,उचलावेत काही शब्द…काही क्षण… आणि लिहीत…

  • गोठा – GOTHAA (COW SHED)

    माईंचा गोठा रिकामा झाला. दुभती म्हैस कुलकर्णीने नेली. भाकड गाय गोशाळेला दिली. माईंनी मोलकर्णीला पगार देऊन, शेणकुटे नाडकर्णींच्या नातवाला होळीसाठी दान दिली. गोठ्यासमोर घोंगडे टाकून माई मग लिहायला बसली. अलक… अती लघुत्तम कथा.

  • जेली – JELLY (DESSERT)

    रांधली स्वतः मी कवठ गुळाची जेली कणकेस भिजवुनी निरांजने दो केली सुकवून तयांना दिवे तेवता दारी थरथरली पर्णे आम्रतरूची सारी

  • रत्नत्रय दीपक – RATNATRAY DIPAK (THE THREE JEWELS LAMP)

    अप्पदिवो मम अलख निरंजन नय दृष्टी सम अलख निरंजन कर्मफळे रसमय मिळवाया रत्नत्रय दीपक उजळाया व्यवहाराचा जम बसवाया मुक्तछ्न्द तम भ्रम पळवाया जीवाचा अभ्युदय व्हाया