Tag: Marathi sahitya

  • गडे – GADE (DEAR FRIEND)

    कप अन बशीला सांग गडे कारण पिशी का भांग गडे शब्दच अडूनी मूक बसे काव्य न कधी विकलांग गडे लगावली – गागा/लगागा/गाललगा/

  • मशी – MASHEE (THE INK)

    रंगपिशी अन काव्यपिशी नित्य पडे प्रेमात कशी पडुनी उठुनी चालतसे अंध नव्हे पडण्यास फशी ललित लिहाया सलिल निळे बनुन झरे मी सहज अशी कर्म कराया ना डरते धर्म अहिंसा जपत मशी भीक न द्याया लागो रे कामच देते खुशी खुशी सांग मला हे सांग खरे लावावी का परत भिशी गाळ कपातच तू कॉफी ठेवाया कप…

  • झेप – ZEP (LEAP)

    निळसर अंबर चाफा कोमल कळ्याफुलांची झेप नि परिमल झळके वनराई … मोद विखरुनी ठाईठाई .. झळके वनराई … चिंब चिंबल्या फांद्यांवरती चिमणपाखरे किलबिलणारी झुले लता जाई … मोद विखरुनी ठाईठाई ..झुले लता जाई … रानफुलांचा हळदी वाफा तृणपात्यांचा हिरवा ताफा गझलगीत गाई.. मोद विखरुनी ठाईठाई ..गझलगीत गाई मुग्ध रक्तिमा अधरी गाली भाळावर पूर्वेच्या लाली सळसळे…

  • टिटवी – TITAVEE (PLOVER)

    भाग्य लिहाया भाळावरती कधी न येते सटवी बिटवी उडता उडता हेच सांगते टिवटिवणारी टिटवी बिटवी मकर संक्रमण सणास कोणी जित्राबांना हाकत येता किराण्यातले वाण लुटूनी अंधाराला पटवी बिटवी नको जीम अन नकोच डायट कामे करते मस्त जेवते रहाट ओढून पाणी भरते वजन बरोबर घटवी बिटवी फटाकडी ना बॉम्ब फटाका वाहन भारी तयात बसुनी मजेत सारी…

  • बॉम्ब लाट – BOMB LAAT (BOMB WAVE)

    बॉम्ब लाट फिरत होती ढोंग ठोक म्हणत होती घाम रक्त होत शाई नीर क्षीर झरत होती गूढ गोष्ट शोधताना वीर वाट मळत होती कर्णवीष वीटधारी ढेकळांस चिरत होती मधुघटात काव्य भरता चिंब चिंब भिजत होती लगावली – गाल/गाल/गाल/ गागा/

  • रोजी रोटी – ROJEE ROTEE (LIVELIHOOD)

    रोज थापते रोजी रोटी मोजत बसते रोजी रोटी पडुन पालथी आगीवरती ओज फुलवते रोजी रोटी कशी द्यायची चुलीसमोरी पोज शिकवते रोजी रोटी नकटे चपटे असो मापटे नोज उडवते रोजी रोटी क्षुधा शमविण्या भुकेजल्यांची बोज उचलते रोजी रोटी

  • फाग – FAAG (HOLI FOLK SONG)

    आग आहे आग मी पूर्ण सुंदर राग मी छप्परांना तोलते काष्ठ मजबुत साग मी चुगलखोरी भोवता अंध म्हणती डाग मी माल कच्चा जाळण्या यज्ञ आणिक याग मी मूढता नच कोडगी अंतरीची जाग मी परिमलाने धुंदलेली मोगऱ्याची बाग मी वेगळेपण जाणते न वेंधळी न काग मी ना करे रे आजही व्यर्थ भागं भाग मी ऐक माझी…