Tag: Marathi sahitya

  • पदर मलमली मायेचा – PADAR MALMALI MAAYECHAA (DELICATE SAREE PLY OF LOVE)

    पातळ अथवा साडी लुगडे पदर मलमली मायेचा नऊवार वा सहावार रे पदर मलमली मायेचा मोरपिसे साडीवरची मम रांगोळीतुन अवतरता अडखळते अन मी सावरते पदर मलमली मायेचा ऊनपावसामध्ये घेता शिरी लपेटुन पदराला सुकती भिजती मोरपिसारे पदर मलमली मायेचा अलामतीवर डे रे ते ये किनार भगवी नाजुकशी रदीफ घनसर गडद काफिये पदर मलमली मायेचा जमीन आई धरा…

  • प्राचीन कर्म – PRAACHEEN KARM (DEEDS IN PAST))

    जेंव्हा मला स्मरे तव प्राचीन कर्म वेडे होतात त्या क्षणी मम शुभ भाव नर्म वेडे निष्पाप मूक प्राणी करुनी शिकार त्यांची थैल्या खुशाल शिवती सोलून चर्म वेडे जपण्यास जीव माझा मी आत्मधर्म जपते उचलून पंथ धरती त्यागून धर्म वेडे त्यांना न साधले जे आम्हास साधता रे का बोट ठेवताती धुंडून वर्म वेडे टाकून बोलताती बोलून…

  • गुडघे – GUDAGHE (KNEES)

    ढोपर घोटे गुडघे काळे अवयव घासुन अवघे काळे उगाळून कातळी कोळसा जे झाले ते कर घे काळे पोकळीत तू जरी राहशी ये बाहेरी धन घे काळे कर्मनिर्जरा करावयाला अंबरातले घन घे काळे कुठल्याश्या स्वर्गातुन उतरुन भूमीवरले फळ घे काळे

  • अलना – ALANAA(SHORTEST DRAMA)

    अलना बाप : बांगड्या भर लेका ! पोरीपण जास्त कमवायला लागल्यात तुझ्यापरीस….. लेक : बांगड्या भरा बापा ! लेक कासार है …….. फुकटात फ्याशिलिटी ! शब्दार्थ अलना – अती लघुत्तम नाटक

  • निर्भेळ भेळ – NIRBHEL BHEL (PURE BHEL PURI)

    निर्भेळ भेळ माझी आहे गझल गुणांची दिलदार खेळ माझी आहे गझल गुणांची ताशा गिटार बाजा वेणू गुणी तुतारी संगीत मेळ माझी आहे गझल गुणांची रानात शांत समयी ओटी भरून आई उजवेल केळ माझी आहे गझल गुणांची रत्नेच जी अपत्ये त्यांना सुखे रहाया साधेल वेळ माझी आहे गझल गुणांची परिणाम भाव शुद्धी हेतूत आत्मगोष्टी म्हणतेय हेळ…

  • लोंढा – LONDHAA (FLOW)

    धादांत खोटे बोलले मी पण क्लांत खोटे बोलले मी कोंडीत लोंढा दाटलेला मन शांत खोटे बोलले मी जे जे हवे ते प्राप्त होता मज भ्रांत खोटे बोलले मी अज्ञान माझे दावण्यास्तव ते प्रांत खोटे बोलले मी बोंबा खऱ्या होत्या जरी त्या आकांत खोटे बोलले मी

  • गझलमणी – GAZAL MANEE (JEWEL OF GHAZAL)

    जादुगार सोन्यासम पिवळा,करांगुलीवर नीलमणी.. खरा दागिना हेमंताचा,झळाळणारे शील मणी… सोन्याचे मी मणी गुंफिता,जुन्याच धाग्यामधे पुन्हा.. कनक मण्यांच्या माळेमध्ये,झाले नव सामील मणी … गळ्यात काळी पोत मण्यांची,मोजले न मी मणी जरी… अजून कांही आले तेंव्हा,करण्यासाठी डील मणी… आई माझी शिरोमणी जणु ,कधी न गळले अश्रु तिचे… मोरपिसांसम मायेच्या मज,तिच्या सयी सच्छील मणी… स्फटिक मण्यांची माळ जपाची,मणी…