Tag: Marathi sahitya

  • रणसती – RANSATEE

    ज्ञाता घन रणसती दिशादश सोळा मात्रा व्रती दिशादश वीणा नव छेडता सुरावट भरते घट जिनमती दिशादश गागागागा गालगा लगालल वामा मधुमालती दिशादश वेल लता वल्लरी चढे वर तेजस्वी तळपती दिशादश मुखकमलावर सुनेत्र दीपक आत्मरती पावती दिशादश

  • तोफावाली – TOFAVALI(CANNON HOLDER)

    समुद्र धरती भेट तटावर ठासून दारुगोळा उसळत लहरी कैक मनावर ठासून दारुगोळा आज चेन्नई गत मद्रासी जुनी पुराणी भांडी तोफावाली नाव जलावर ठासून दारुगोळा उपादान तव आत्मा केवळ हृदयमंदिरी प्रतिमा निमित्त पात्रे आधारावर ठासून दारुगोळा कथा जीवनी फुले उमलता कोमल दरवळणारी फळ मोक्षाचे पण सत्त्यावर ठासून दारुगोळा दो बाहूंचे यान ठाकले चरणतळी मम भूमी मुळी…

  • निवळे – NIVALE

    ताम्रघटावर पर्ण वसन सोन्यासम पिवळे नारळ कळसा हिरवी राई ग्राम ग किवळे .. खणखणणारी कुंदन नाणी करात माझ्या गझल “सुनेत्रा” ताल बांधता सुरात माझ्या….. ……. रुबाईतले मुक्तक माझे उदका निवळे..

  • धरोहर -DHAROHAR

    गगन गिरीवर ख पुष्प अंथर सायंकाळी मुक्त धरोहर निर्झर हसरे झील सरोवर चित्र हवे ते उतरव भू वर नीलमण्यांची किमया हितकर ये पारीसा नेस पितांबर सखी “सुनेत्रा” लखलख अंबर

  • अकोळ – AKKOL

    शास्त्रात घोळ कोठे शोधा बरे दमाने योगात टोळ मोठे शोधा बरे दमाने शेरा न मोल तोटे शोधा बरे दमाने गझली अकोळ गोठे शोधा बरे दमाने घटना जरी कळाली घटनेत घट पटाचा गावी मुधोळ लोटे शोधा बरे दमाने गागागागा लगा लगागा आहेच दोन वेळा देहास खोळ बोटे शोधा बरे दमाने जुल काफिया ग सवती आहे इथे…

  • उपाधी – UPAADHI

    १)शास्त्र .. सहज सुचतं काहीतरी वाचत वाचत बरसती सरी इजा बिजा आणि तिजा शास्त्र वाचत घेते मजा सुनेत्रा घेत नाही रजा ग्रंथ देत नाही सजा …. २)मुक्तक .. घोळ भक्ति शक्ति जेथ नांदतात संग सत्त्यता शिवात सौंदर्यात जात पात भेद संपवून घोळ सम्यक दृष्टि जीव चालतात संग .. ३)तीनशेरांचे मुक्तक .. उपाधी घटना कुठली आधी…

  • लाडू – LAADOO

    डिंकाचे मी खाईन लाडू हक्काने मी खाईन लाडू दाबत फिरवत वळून झेलून हाताने मी खाईन लाडू राजगिरा चुरमूरे चण्यांसह लाह्यांचे मी खाईन लाडू लिच्ची पेरू चेरी जांभूळ बोरांचे मी खाईन लाडू दुःख न उरले बाकी ‘सुनेत्रा’ बुंदीचे मी खाईन लाडू