तोफावाली – TOFAVALI(CANNON HOLDER)


समुद्र धरती भेट तटावर ठासून दारुगोळा
उसळत लहरी कैक मनावर ठासून दारुगोळा

आज चेन्नई गत मद्रासी जुनी पुराणी भांडी
तोफावाली नाव जलावर ठासून दारुगोळा

कथा जीवनी फुले उमलता कोमल दरवळणारी
फळ मोक्षाचे पण सत्त्यावर ठासून दारुगोळा

उपादान तव आत्मा केवळ हृदयमंदिरी प्रतिमा
निमित्त पात्रे आधारावर ठासून दारुगोळा

दो बाहूंचे यान ठाकले चरणतळी मम माती
मुळी न थरथर रोमांचावर ठासून दारुगोळा

मूळ कारणे कोण जाणतो यावे त्याने पुढती
उड्डाणास्तव सती गडावर ठासून दारुगोळा

शिवार वावर शेतमळा वा रान असूदे भूमी
गझल करतसे राज्य जगावर ठासून दारुगोळा

अडला अथवा नडला कोणी वसंतवाटेवरती
स्वार जाहला वारा त्यावर ठासून दारुगोळा

ठाम “सुनेत्रा” तत्त्वावरती उभी टोक गाठूनी
कुणा न म्हणते सावर आवर ठासून दारुगोळा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.