-
विलय – VILAY
स्वर परिमल मम वेड लावतो ….. सहज वाहतो काव्यकलेतुन ….. अक्षर अक्षर वेचून मी मग….. एक गुंफते मोतीमाला…. स्वराक्षरातून नाद अंतरी उमटत जातो…. वलय वाढते…. विलय पावते काठावरती ….. तृणांकुरांवर…. दव बिंदूंसम…. ……
-
माझे मुली – MAAZE MULEE
हवेसारखो अवतीभवती सदैव माझ्या असतेस तू… दूर कुठे इथेच घरभर रंग उधळित असतेस तू… मुक्तछंद झऱ्यासारखी खळाळत वाहत रहा … तुझा आनंद जाशील तिथे मुक्त मुक्त उधळत राहा .. … माझे मुली सांग तुला काय देऊ… माझ्याकडून … आज भेट… तूच दिलास तुझ्या रुपात.. अनमोल ठेवा भेट… तुझा जन्म तुझा आहे .. तुझ्यासाठी जगत रहा…
-
फापटपसारा – FAAPAT PASARAA
कवीच्या जाण्याचे दुःख .. कवी नावाच्या संवेदनशील हृदयाला होतच असते… कारण… त्याच संवेदनशीलतेने… त्यानेही टिपलेली असतात … हळुवार मनाची स्पंदने…….. कधी हाताच्या बोटांची थरथर… कधी पूर्ण अंगावर अचानक उठलेले शहारे …. बोलत असतात…. त्याच्याच भाषेतून…. ती भाषा…. कुठल्याही पुस्तकात वाचून शिकता येत नाही…. त्या भाषेला व्याकरण नसतं … फक्त भाव असतो…. ते अनुभवत कवीचं हृदय…
-
पाऊले – PAAOOLE
पाऊले वाळवंटी चालती ही पाऊले सामान अपुले वाहती ही पाऊले हे निळे आभाळ वरती दाटुनी यावे कधी भिजविण्या रेती तळीची गावे कधी ….. नित्य लिहावे काहीतरी मी मला जिंकण्यासाठी मला जिंकुनी मीच लिहावे मला हरवण्यासाठी शब्दांमधुनी मोद उधळते भूवर साऱ्या वरती जाते कधी कधी मी गगन चुंबण्यासाठी
-
पूल – POOL
पूल … पूल तर पुद्गल आहे…जिवंत माणसांनी माणसांसाठीच बांधलेला… माणसांबरोबर त्यावरून चालत जातात प्राणीसुद्धा… आणि माणसांचे सामान वाहणारे प्राणी आणि वाहनेसुद्धा! नदी जेंव्हा कोरडी ठक्क असते तेव्हा या पुलाखालीसुद्धा गोरगरिबांचे संसार उभे राहतात. पुलाखाली माणसे राहतात…आपल्या मोडक्या तोडक्या झोपड्यांमधून… त्यांनी पाळलेल्या कुत्र्यामांजरांसोबत, गाढवे आणि शेळ्यांसोबत भटकी कुत्रीही असतातच… हा पूल जेव्हा बांधला तेव्हाच्या आठवणी सांगणारे……
-
मैत्री माझी – MAITREE MAAZEE
कोणाला मैत्रीत हसायचं असतं… कोणाला काही सांगायचं असतं …. कोणाला काही पहायचं असतं… कोणाला काही ऐकायचं असतं… कोणाला कधीतरी रडायचंही असतं …. कोणाला तर काहीही करायचंच नसतं …. पण तरीसुद्धा …. मैत्रीच्या समूहात टिकायचं असतं …. वेगळे वेगळे असलो तरी …. वेगळेपणाला खूप खूप जपत… सगळ्यांसोबत रहायचं असतं…. सगळ्यांचंच सगळं सारखं नसतं …. बरंच काही…
-
संशोधन – SANSHODHAN
संशोधन वा असो माहिती मला न कळलेली आता आता मला मिळाली थोडी जळलेली आवडल्यावर समजुन घेणे ही प्रीती असते अनोळख्याला समजुन घेणे अवघड भलते असते गुणगुणता मी अधरी आली ओळ सहज सहज … भलते सलते अर्थ कशाला डोक्याला ताप … .