Tag: Muktachhand

  • फापटपसारा – FAAPAT PASARAA (MESS)

    कवीच्या जाण्याचे दुःख .. कवी नावाच्या संवेदनशील हृदयाला होतच असते… कारण… त्याच संवेदनशीलतेने… त्यानेही टिपलेली असतात … हळुवार मनाची स्पंदने…….. कधी हाताच्या बोटांची थरथर… कधी पूर्ण अंगावर अचानक उठलेले शहारे …. बोलत असतात…. त्याच्याच भाषेतून…. ती भाषा…. कुठल्याही पुस्तकात वाचून शिकता येत नाही…. त्या भाषेला व्याकरण नसतं … फक्त भाव असतो…. ते अनुभवत कवीचं हृदय…

  • हूड बाळ – HOOD BAAL (ENERGETIC CHILD)

    खडकांतुन उडत झरत निर्झर ये गीत गात जायचे तया खुशीत करित रम्य नृत्य नाच वळणावर घेत उड्या पर्वतास भेट खड्या सखाच हा तुझा कड्या कड्यास साद हसत देत बिजलीसम लखलखत निर्झर ये गात गात …. वाटेवर पोरधरी मिळवतील हात जरी सान पोर समजुनी पकडतील जर कुणी त्यांस जळी पाडूनी झरा शिरे दाट वनी जोरदार धडक…

  • पाऊले – PAAOOLE (FOOT STEPS)

    पाऊले वाळवंटी चालती ही पाऊले सामान अपुले वाहती ही पाऊले हे निळे आभाळ वरती दाटुनी यावे कधी भिजविण्या रेती तळीची गावे कधी ….. नित्य लिहावे काहीतरी मी मला जिंकण्यासाठी मला जिंकुनी मीच लिहावे मला हरवण्यासाठी शब्दांमधुनी मोद उधळते भूवर साऱ्या वरती जाते कधी कधी मी गगन चुंबण्यासाठी

  • पूल – POOL

    पूल … पूल तर पुद्गल आहे…जिवंत माणसांनी माणसांसाठीच बांधलेला… माणसांबरोबर त्यावरून चालत जातात प्राणीसुद्धा.. आणि माणसांचे सामान वाहणारे प्राणी आणि वाहनेसुद्धा! नदी जेंव्हा कोरडी ठक्क असते तेव्हा,, या पुलाखालीसुद्धा गोरगरिबांचे संसार उभे राहतात. पुलाखाली माणसे राहतात…आपल्या मोडक्या तोडक्या झोपड्यांमधून… त्यांनी पाळलेल्या कुत्र्यामांजरांसोबत, गाढवे आणि शेळ्यांसोबत भटकी कुत्रीही असतातच… हा पूल जेव्हा बांधला तेव्हाच्या आठवणी सांगणारे……

  • मैत्री माझी – My friendship

    कोणाला मैत्रीत हसायचं असतं… कोणाला काही सांगायचं असतं …. कोणाला काही पहायचं असतं… कोणाला काही ऐकायचं असतं… कोणाला कधीतरी रडायचंही असतं …. कोणाला तर काहीही करायचंच नसतं …. पण तरीसुद्धा …. मैत्रीच्या समूहात टिकायचं असतं …. वेगळे वेगळे असलो तरी …. वेगळेपणाला खूप खूप जपत… सगळ्यांसोबत रहायचं असतं…. सगळ्यांचंच सगळं सारखं नसतं …. बरंच काही…

  • शिशीर गान – SHISHEER GAAN (song of winter)

    पाऊस यावा अंगणभर अंगांगी काटे कुंपणभर आवाज यावा ढगी गड गड पडाव्या गारा छपरावर वेचाया हातांची ओंजळ करू मुठीत मोठाल्या गारांना धरू मंडपी चिंब जाई नि जुई जा ग जा चिऊ घरट्यात बाई जा उड रे काऊ शुभ शुभ गाऊ शिशिरात बुडण्या धारांत न्हाऊ

  • संशोधन – SANSHODHAN (amendment)

    संशोधन वा असो माहिती मला न कळलेली आता आता मला मिळाली थोडी जळलेली आवडल्यावर समजुन घेणे ही प्रीती असते अनोळख्याला समजुन घेणे अवघड भलते असते गुणगुणता मी अधरी आली ओळ सहज सहज … भलते सलते अर्थ कशाला डोक्याला ताप … .