Tag: Muktachhand

  • गोष्टी – GOSHTEE

    काही गोष्टी कळत असतात पण वळणावर वळत नसतात सैरावैरा पळत असतात…. गोष्टी अशाच द्वाड असतात वाऱ्यासारख्या उनाड असतात. . मुसंडी मारून मनात घुसतात तुझ्या माझ्या… आठवणींना उचकटतात विस्कटतात चहूकडे भिरकावतात …. एक इकडे एक तिकडे एक वर एक खाली एक तिकडे कोपऱ्यात कोणी हळवी कोमात …. एक हसते एक रुसते कोणी चिडते धुमसत बसते कुणी…

  • सहज सहज तू – SAHAJ SAHAJ TOO

    सहज सहज तू लिहित रहावे तेच खरे मम मानस व्हावे तुझे न माझे असे नसावे ओंजळ भरुनी द्यावे घ्यावे नीतळ रेखिव मुक्तछंद तव जणु पानांवर ओघळते दव ओघळताना टिपते मी रवं मुक्तछंद वा गझलवृत्त ते पकडून त्याला शब्द खरडते शब्दांसंगे मी झुळझुळते कशास ओळी मोजुन लिहू मी भाव निरागस का लपवू मी शब्द जरी घाईत…

  • रेन एणाराय – RAIN ENAARAAY (“It is going to rain”)

    येणार हाय एणाराय पाऊस येणार हाय रेन एणाराय झिमझिम सरींनी अंगण भिजणाराय कधी काळी जमिनीत पेरलेलं बी बियाणं बोलू लागणाराय अंकुरातून अक्षर अक्षर मान वर उंच करणाराय अक्षर अक्षर चढत वर शब्द सुंदर दिसू लागणाराय नाजुक पोपटी पानांवर शब्द शब्द बरसू लागणाराय शब्दांचीच पानं होणाराय पानांचेच शब्द होणाराय पानं पानं जोडून जोडून डहाळी डहाळी डूलणाराय…

  • खरेपणा – KHAREPANAA (Authenticity)

    मुक्त जाहले जीव सर्व हे आज सुखाचा दिवस खरा सर्व जिवांचा धर्म अहिंसा खरेपणा हा मंत्र बरा जीवासाठी जीव जपूया प्रेमासाठी प्रेम जपू हृदयामधला ईश्वर दिसण्या प्रत्येकातील मूल जपू पूर्ण कराया तरुणांच्या अन बालांच्याही इच्छांना वृद्धत्वातील बाल्य जपूया बाल्यामधल्या मोदांना नको वाटते कर्मकांड तर उखडुन टाका मनातुनी दिसेल तुम्हा आत्म्यातिल इश नित्य उमलत्या फुलातुनी उडा…

  • लिहीन लिहीन – LIHEEN LIHEEN (“I will write,I will write”)

    लिहीन लिहीन काही पण लिहीन पण लिहीनच लिहीन लिहीत राहीन लिहीत राहीन जमेल तोवर लिहीतच राहीन सुचेल छान छान मस्त मस्त ते ते सारे लिहित राहीन कशाला थांबू कशाला अडखळू उगाच अडखळून पडू बिडू सापडतील ते शब्द घेईन ओळींची गाडी पुढेच नेईन झुक झुक झुकाक धावत राहीन इंजिन बनून शिट्टी घालेन हवेत धूर नाही वाफ…

  • तू अन मी – TOO AN MEE (you and me)

    अता तुझी ना आठवण येते तुझ्यात दडल्या अनेक ‘तू’ची कधीकधी पण आठवण येते नकळत झाली भेट तरीही नजर भिडविली कधी जरीही आठवुन ना पण धडधड हृदयी केव्हातरी मी तुजला बघते अता तुझी ना आठवण येते नाजुक साजुक गुपिते गोष्टी उघडुन मम प्रेमाची सृष्टी कधी न होते दुःखी कष्टी सत्य कळावे फक्त वाटते अता तुझी ना…

  • गुरुजी – GURUJEE (Master)

    इमली ओक अन एनर्जी बोकोबा त्यांचे गुरुजी इमली आंबट चिंबटशी ओक वृक्ष पण आळशी एनर्जी ती सदा हसे शिकवीत त्यांना धडे बसे म्हणे ,” I (आय) बघ इमलीचा O (ओ) ओकतो मस्तीचा मस्तीमधल्या युक्तीचा N (एन) अर्जीच्या शक्तीचा बोकोबांच्या भक्तीचा”. इमली ओक अन एनर्जी बोकोबा त्यांचे गुरुजी…