अरण्य भरले फळाफुलांनी वारा वाहे अः अः
आठवणीतिल तळ्यात नावा तरंगणाऱ्या पहा पहा
इमारतीतिल कैक सदनिका कैक उघडल्या रः रः
ईश्वर केवलज्ञानी ब्रम्हा दिशादिशातुन दहा दहा
उग्र तपाने प्राप्त मुनींना ऋद्धी सिद्धी मः मः
ऊर्ध्वगति जीवास घेऊनी… चिंब पावसी नहा नहा
ऋजुगति ऋजुमति सरळ सरल जे जाणायाला वः वः
लृकार अक्षर सुवर्णकांती विघ्नविनाशक मः मः
एकत्त्वाचा भाव षण्मुखी विविधतेतही पः पः
ऐकायाला जाणायाला विमल मनाने वहा वहा
ओठांवरती ओम सिध्येभ्यः असूदेत वा जः जः
औत फिरवुनी शेतामध्ये मोज अंक तू सहा सहा
अंगठीतले मौक्त्तिक माझे दोन जरी ते दः दः
अः अः चा जप कर आणिक लवंगपुष्पे वहा वहा
गझल मात्रावृत्त (मात्रा ३०… १६/१४)