नकोच काही देणेघेणे लिहावी छान मी गझल
फुलपाखरासम उडायाला विणावी छान मी गझल
उडून उडून दमल्यावरती चित्रात रेखण्या तिला
चिमटीत सान पकडुन पंख धरावी छान मी गझल
अंगणातल्या दोरीवरती वाऱ्यात सुकवायाला
बुडवून वाहत्या निर्झरात पिळावी छान मी गझल
भूचक्रासम गरगर फिरण्या तेलात सोडून उष्ण
तांबूस लाल खुलाया रंग तळावी छान मी गझल
झुळझुळ पहाट वाऱ्यासंगे झराया अक्षर मोती
सुनेत्रातल्या दवबिंदूसम टिपावी छान मी गझल
मात्रावृत्त २९ मात्रा (१६/१३)