तू नवल घडविले रे जे वाटले अगम्य
शत्रुत्त्व राहिले ना झालेय आज धन्य
हुलकावणीत गेला अज्ञात भूतकाळ
केले गुन्हे गुलाबी ते वाटतात क्षम्य
ते आठवू कशाला घडले न जे कधीच
आहे भविष्य उज्वल मम् वर्तमान रम्य
ज्यांच्यासवे मनाने मी जोडलेय मैत्र
मोहांध ना मनुज ते दिलदार सैन्य वन्य
मूर्तीतल्या अनामिक या वंदिते जिनास
आत्म्यात ईश आहे नाही कुठेच अन्य
गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा २३)
लगावली – गागालगा/लगागा/गागालगा/लगाल/