वय माझे बघ झाले सत्तर
भेटायाला आले जलचर
फुलात दडला सुगंध हो तू
हवा वाहण्या चंचल नवथर
मूर्त घडवशिल केव्हा माझी
प्रश्न पुसाया येतिल पत्थर
पदर उडे वाऱ्यावर रमणी
नकोच होऊ कातर सावर
जिनास वंदन करते बालक
बिंब सावळे आहे अघहर
गझल मात्रावृत्त – (मात्रा १६)