घरी वावरे रस्त्यावरची वर्दळ जेंव्हा मुकीमुकी
परसामध्ये राबत बसते मर्गळ तेंव्हा मुकीमुकी
कोरांटीचे कुंपण हिरवे नाजुकसाजुक सान कळ्या
आठवते मज सावलीतली कर्दळ केंव्हा मुकीमुकी
…
गडद निळाई वाकुन बघते हौदामधल्या जळी
पेंगुळलेली रातराणी गोकर्णीसम निळी
अश्या अवेळी निळ्या घनातुन बरसे जेंव्हा धार
जळात उठती थेंबांभवती वलये गोलाकार
…
अती लघुत्तम कथेस म्हणती अलक बरे
अश्या कथेची दाखवते मी झलक बरे
चारोळीशी येता मुक्तक भांडाया
बसे रुबाई भांडण त्यांचे मिटवाया
…