मौक्तिकांस मी ओळखते
खऱ्या हिऱ्याला पारखते
कर्म निर्जरा करावया
लावुन काडी जाळ खते
पाण्यासंगे झाडाला
करून आळे घाल खते
खतांचाच तू व्यापारी
भर पोते अन वीक खते
चाळणीतल्या जलामधे
मिसळुन सारी गाळ खते
तर्हेतऱ्हेच्या कुदळीन्नी
खणून खड्डा गाड खते
अलख निरंजन म्हणताना
स्वामी हसती गोरख ते
गझल मात्रावृत्त (१४ मात्रा)