गढुळलेल्या दो नद्यांचे गोठले जल
काव्य माझे वाहणारे जाहले जल
कैक सुंदर भावनांचे अंबरी घन
नाचता त्यातून बिजली सांडले जल
ज्या अहंतेला स्वतःचे ना जरी भय
त्या मदांवर मी खुषीने सोडले जल
बंगला गाडी तुझी ती हाय क्षुल्लक
त्याहुनी प्रिय आसवांचे वाटले जल
आपला पाऊस असुनी वाटतो पर
वाटुदे कोणास काही बोलले जल
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २१)
लगावली – गालगागा/ ३ वेळा