मी आत्मसुंदरी आहे
लढणार संगरी आहे
निष्पाप माणसे माझी
जपणार अंतरी आहे
होतोय फायदा पुण्या
हा न्याय भूवरी आहे
आभाळ टेकले भूवर
जिनदेव मंदिरी आहे
मम् शस्त्र लेखणी भारी
संदेश अक्षरी आहे
चिखलात पत्रिका बुडली
नक्षत्र अंबरी आहे
आत्म्यास जाणता कोणी
देवत्त्व कंकरी आहे
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा १४)
लगावली – गागालगा/लगागागा/