आहुती – AAHUTEE


यज्ञामध्ये दे ग आहुती तूच श्यामले
पण कार्याची घेच पावती तूच श्यामले

आठवणीने तुझ्या फाइली ठेव पावती
शोध कागदी निळी नाव ती तूच श्यामले

कनकलतेवर फुले कंचनी तळी मृदा घन
त्याच मृदेची बनव आरती तूच श्यामले

वरवरच्या रंगाला भुलली मिथ्यादेवी
सुखी अंत अन खरी आदि ती तूच श्यामले

मातृदेवता अंबा दुर्गा तुझ्या अंतरी
भादव्यातली सरल गौर ती तूच श्यामले

गझल मात्रावृत्त (मात्रा २४)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.