इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहाचीआस्वादात्मक
समीक्षा
लेखिका सुनेत्रा नकाते
प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे
प्रकाशक/मुद्रक दीपक चांदणे, अस्मिता चांदणे
प्रथमावृत्ती १६ जून २०१३,स्वागत मूल्य १५० रुपये
अर्पण पत्रिका
माझी आई श्रीमती पद्मावती सुभाषचंद्र अक्कोळे
हिच्या चरणी अर्पण
मनोगत
मी जेव्हा गझल लेखनास प्रारंभ केला तेव्हा श्री इलाही जमादार यांच्या गझला वाचून मी खूप प्रभावित झाले. श्री इलाही जमादार यांचे गझलसंग्रह वाचल्यानंतर माझ्या मनात गझल या काव्य प्रकारासंबंधी, तिचे अंतरंग, तिच्या वृत्ती-प्रवृत्ती, तिचे रंगरूप या विषयी कमालीची ओढ निर्माण झाली.
गझल लेखन माझ्यासाठी इतके आनंददायक ठरलेकी त्यामुळे माझी प्रत्येक भावना अगदी फुलांप्रमाणे सुगंधित, कोमल, रंगीबेरंगी होऊन उमलू लागली.
कविवर्य इलाही जमादार यांची तुझे मौन ही प्रदीर्घ ग़ज़ल वाचून मी त्यावर छोटेसे भाष्य लिहिले. ते भाष्य मला खूपच प्रेरणादायी ठरले. त्यामुळे मी त्यांच्या सात ग़ज़लसंग्रहांवर आस्वादात्मक व समीक्षात्मक भाष्य करू शकले.
समीक्षेच्या निमित्ताने बऱ्याच जुन्या नव्या ग्रंथांचे वाचन, मनन व चिंतन केले. त्यामुळेच माझी समीक्षा जास्तीत जास्त परिपूर्ण तरीही टोकदार न बनता अनेकांतात्मक होण्यास मदत झाली. गझलेसारख्या हळूवार काव्यावर समतोल भाष्य मी करू शकले.
माझा मित्रपरिवार, माझे आप्तस्वकीय, बाल्यावस्थेपासून आजपर्यंत शेजारी, हितचिंतक यांनी मला कळत नकळत जे सहाय्य केले त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.
या पुस्तकाचे प्रकाशक प्रतिमा पब्लिकेशन्स चे श्री दीपक चांदणे व सौ.अस्मिता चांदणे यांनी स्वतः घरी येऊन माझे साहित्य प्रकाशित करण्याची इच्छा व्यक्त केली व त्याप्रमाणे काम पूर्ण केले. त्याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे,
अनुक्रम
१ गझलेचे स्थान/७
२ मराठी गझल क्षेत्रात कविवर्य इलाही जमादार यांचे योगदान/२२
३ जखमा अशा सुगंधी/७५
४ भावनांची वादळे/८६
५ सखये/९८
६ मोगरा/१०७
७ तुझे मौन/११४
८ अर्घ्य/१२१
९ चांदणचुरा/१३८
१० उपसंहार/१५९
क्रमश …