उचललास तू – UCHALALAAS TOO


उचललास तू रदीफ माझा टाळलेस मम काफियांस का
जमीन अवघी सुंदर असुनी गाळलेस मम काफियांस का

राखेमधल्या ठिणग्यांमधुनी झळाळून ते उठतिल पुन्हा
ठाउक होते सत्य तुला पण जाळलेस  मम काफियांस का

ऊन देउनी पाखडलेले पारखलेले निवडक असुनी
तुझ्या फाटक्या चाळणीतुनी चाळलेस  मम काफियांस का

बिनकाटेरी तव कवितेला बाभुळकाटी कुंपण असता
राखण करण्या काव्यफुलांची पाळलेस  मम काफियांस का

वृत्त राजसी वृत्ती सात्विक अवतीभवती गझला सुरभित
तरी ‘सुनेत्रा’ कुंतलात घन माळलेस  मम काफियांस का

मात्रावृत्त ( ८+८+८+८=३२ मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.