झोपावया सुखाने लाटांस अंथरू
आहेच ओंडका मी नाहीच पाखरू
गागालगा लगागा गागालगा लगा
आहे लगावली तिजलाच वापरू
मात्रा इथे किती ते मोजून सांगते
बावीस त्या बरोबर त्यांनाच सावरू
शेरात या कशाला मम नाव मी लिहू
हा शेर टोचरा जर आहेच गोखरू
जलदापरी सुनेत्रा ओतून घागरी
अर्थास र्सार्थ करण्या देहास मंतरू