आयुष्य सुखाने जगतो आम्ही
आयुष्य सुखाने भरतो आम्ही
व्यापार सुखाचा करती कोणी
आयुष्य सुखाचे करतोआम्ही
चारित्र्य घडाया अपुले सुंदर
आयुष्य सुखाचे स्मरतो आम्ही
पाऊस पडाया निघतो जेव्हा
आयुष्य सुखावर फुलतो आम्ही
धारांत भिजाया येता ओढा
आयुष्य सुखावर झुलतो आम्ही
गझल मात्रावृत्त (मात्रा १८)