माझी अमूल्य काव्ये त्यांच्यात प्राण आहे
हृदयात गाढ श्रद्धा लय सूर ताल आहे
जे जे हवे हवेसे खेचून घ्यावयाला
नजरेत चुंबकाची माया तिखार आहे
शब्दात भाव भरता गझलेत नाचती ते
नृत्यास अर्थ देण्या त्यांच्यात धार आहे
मी घालतेन चिलखत तलवार म्यान केली
मम् लेखणीच आता झाली कट्यार आहे
जेथे गचाळ पाणी डबकी तळ्यात साठे
पोचेल नेट तेथे जालात डास आहे
गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २४)
लगावली ( गागालगा/लगागा/गागालगा/लगागा/ )