पाचोळा अन हिरवळ भूवर
आठवणींचा दरवळ भूवर
तव पदराची सळसळ भूवर
कुणा वाटते मृगजळ भूवर
किणकिणणारी कांच कंकणे
जणू झऱ्याची खळखळ भूवर
मृणाल कैसी फसेल चिखली
उमटव उमटव करतळ भूवर
नाच ‘सुनेत्रा’ जलदांमधुनी
झरण्या मौक्तिक घळघळ भूवर
गझल मात्रावृत्त – १६ मात्रा