भाव शुद्ध अर्पिते प्रभूला प्रभूसम होण्या
ओंजळ भरली शुभ्र फुलांनी अर्घ्य वाहण्या
जाई जुई प्राजक्त मोगरा विपिनी फुलला
सळसळणाऱ्या नवपर्णांनी पिंपळ सजला
निसर्गातले रंग उधळण्या वसंत आला
आभाळातून कलश घनांचा झरू लागला
सृष्टीमातेच्या चरणी मम माथा झुकला