पेटुनीया कळशी पेटली
मरिचीची ढग उशी पेटली
मार्जात्याच्या घोडचुकीनें
हॅरीची मावशी पेटली
काढेपंडित मंत्र विसरता
सणक मस्तकी कशी पेटली
विषमय काढा कढईमधला
ओतण्यास सांडशी पेटली
पॉटर कुंभारास भेटण्या
टणक कपाची बशी पेटली
फुकनीने मी फुंक मारता
एक चूल आळशी पेटली
राख पेरता हलके हलके
वाडग्यात लापशी पेटली
गझल मात्रावृत्त (मात्रा १६)