कशाला या उठाठेवी, जना सांगावया काही
उठा बोला मना सांगा, लिहाया लीलया काही
कुणी नाहीच मोठारे, तसा नाहीच छोटाही
अता छोटे बनूयाहो, बरे बोलावया काही
कशी भाषा फुलावी रे, असे हे मौन लोकांचे
जरा भांडा स्वतःशीही, चुका टाळावया काही
नवी गीते रचू गाऊ, क्षमेने क्रोध जाळूया
अहिंसा धर्म जीवांचा, खरा जाणावया काही
करूया शांत पृथ्वीला, जपोनी गारवा येथे
फुलांच्या आर्जवाचा या, वसा पाळावया काही
वृत्त – ल गा गा गा, ल गा गा गा, ल गा गा गा, ल गा गा गा.