अता कशास बोलणे लिहेन कायबाय मी
लिहून गझल पावसा स्मरेन कायबाय मी
कुणास काय वाटले कुणास काय टोचले
नकोच हृदय सोलणे विणेन कायबाय मी
तशीच सांज ती दुपार भांड भांड भांडणे
तशी पहाट यावया रचेन कायबाय मी
कितीक रंग ईश्वरा तुझे नभात सांडती
तसेच रंग उगवण्या पुरेन कायबाय मी
अनाम ओढ लागता तुझेच नाम जिनवरा
इथून न्यावया पुढे जपेन कायबाय मी
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २४)
लगावली – लगा लगा लगा ल गा/ लगा लगा लगा ल गा/