सजग जाहला ना मोहरला अजिंक्य ठरला भरला प्याला
सरळ सरळ जाहल्यावरी तू प्यावा सरला भरला प्याला
पात्रामधला नाद सुरे ऐकत थरथरला भरला प्याला
ओतत ओतत जलास कोणी म्हणते झरला भरला प्याला
अंतर्यामी तुझ्या नि माझ्या मूर्त साजिरी डुलते आहे
अंतरातल्या जलास निर्मल भरून भरला भरला प्याला
चिखलामधल्या कमळी फसला उदक शिंपुनी पवित्र झाला
झळाळणाऱ्या मृगनीरावर मजेत तरला भरला प्याला
अनेक प्याले रिते कराया अनंत प्याले पुन्हा भरोनी
तृप्तीने ओसंडुन जाता मी तो धरला भरला प्याला
जावा नंदा भांडत असता इमल्यासाठी बांधावरती
म्हणतो मजला लाडे लाडे चल चल घरला भरला प्याला
पडावयाचे हरावयाचे भय नव्हते त्याला अन मजला
प्रियेस बघता माथ्यावरती जिंकुन हरला भरला प्याला
कुकडीच्या तीरावर बसुनी मोदक केले एकवीस मी
तप्त वालुकेवरी उकडुनी तू सावरला भरला प्याला
धरणे जोहड हौद भरोनी वाड्या वस्त्या शहरांमधली
बाग फुलविण्या सच्छिद्रांजलीतुन पाझरला भरला प्याला
गझल मात्रावृत्त … ३२ मात्रा